पंचांगानुसार, 29 मे 2026 रोजी एक अत्यंत शुभ आणि प्रभावशाली राजयोग तयार होणार आहे. याला लक्ष्मी नारायण राजयोग म्हणतात. जेव्हा बुध आणि शुक्र यांची युती तयार होते तेव्हा लक्ष्मी नारायण योग होतो. बुध हा बुद्धीचा कारक मानला जातो. ज्यांचा बुध बलवान असतो अशांना व्यवसायात सर्वात जास्त यश मिळतो. तर शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे. सुख संपत्ती आणि कलेचा कारक म्हणजे शुक्र. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी नारायण हा राजयोग निर्माण होतो. या राजयोगाचा कोणत्या तीन राशींवर परिणाम होणार ते जाणून घेऊयात.
Thalapathy Vijay यांचा मूलांक 4 का आहे खास? अंकज्योतिषात दडलंय यशाचं रहस्य
मिथुन राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव
मिथुन राशीचा अधिपती हा बुध असून या राजयोगाचा सकारात्मक परिणाम या राशीवर देखील होणार आहे. या राजयोगामुळे तुम्हाला नव्या संधी मिळतील. या राशींच्या मंडळींमध्ये या दिवसात कमालीचा आत्मविश्वास दिसून येणार आहे. करिअरच्या बाबतीत नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगला योग आहे. याचबरोबर नातेसंबंध देखील सुधारणार आहेत.
सिंह राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव
सिंह राशीसाठी, हा राजयोग अनेक बाबतीत फायदेशीर राहणार आहे. लाभ आणि उत्पन्न देखील वृद्धींगत होणार आहे. या काळात तुमचे नेटवर्क आणि संपर्क वेगाने वाढू शकतात, नोकरी नवी संधी मिळेल. आर्थिक बाबतीत देखील हा काळा लाभाचा आहे.
कन्या राशीवर लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव
कन्या राशीच्या लोकांसाठी, हा काळ त्यांच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल घेऊन येऊ शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील कर्म भावामध्ये तयार होत आहे. त्यामुळे, तुमच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पदोन्नती किवा पगारवाढ मिळू शकते.
नारळी-पोफळीच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर, जाणून घ्या कोकणातील या मंदिराचे वैशिष्ट्य






