फोटो सौजन्य- pinterest
इंदिरा एकादशीचे व्रत आज बुधवार, 17 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी ग्रहाचा राजा सूर्य कन्या राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहेत. पण कन्या राशीमध्ये बुध ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे सूर्य आणि बुध एकाच राशीत असल्याने बुधादित्य राजयोग निर्माण होत आहे. इंदिरा एकादशीला सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे तयार होणारा बुधादित्य योग काही राशीच्या लोकांशी फायदेशीर ठरणारा आहे. या राशींना वर्षाच्या अखेरीस अनेक फायदे होतील. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्या देखील दूर होतील. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधादित्य राजयोगाचा संबंध बुद्धिमत्ता, ज्ञान, प्रगती, समज इत्यादीशी येतो. ज्याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी बुधादित्य योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या
बुधादित्य राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या राशीच्या लोकांना यश आणि प्रगती मिळू शकते. नशिबाची साथ लाभेल. तुम्हाला बऱ्याच काळापासून घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असल्यास या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक मदत होऊ शकते. व्यवसायात गुंतलेल्यांना अधिक फायदा होऊ शकतो.
सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांमधील धैर्य आणि शौर्य लक्षणीयरीत्या वाढेल. ज्यामुळे त्यांना स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करता येईल. सासरच्या लोकांसोबत सुरू असलेले कोणतेही संघर्ष या काळात संपतील. वृषभ राशीच्या लोकांना करिअर सुरु करण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी वेळोवेळी संधी येत राहतील. या काळात तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ राहील. या काळात तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. ज्यामुळे त्यांच्या अनेक चिंता कमी होतील आणि त्यांना दिलासा मिळेल. या काळात कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळा. मिथुन राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते आणि नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
या काळामध्ये वृश्चिक राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळवतील. अडकलेला निधी परत मिळण्याची शक्यता देखील आहे. जर तुम्ही आधी कोणते कर्ज घेतले असाल तर तुम्ही ते सहजपणे परतफेड करू शकाल. परदेशात नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांना यश मिळू शकते. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. तसेच तुम्हाला वरिष्ठांचे आशीर्वाद देखील मिळतील.
धनु राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर आहे. या काळात धनु राशीच्या लोकांना मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. तुम्ही गुंतवणूक करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)