फोटो सौजन्य- pinterest
सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य देव दर महिन्याला एका निश्चित वेळेला आपली राशी बदलत राहतो. सध्या सूर्य देव वृषभ राशीमध्ये स्थिर आहे आणि आता तो आज 15 जून रोजी आपले स्थान बदलून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीमधील सूर्य देवाचे हे संक्रमण काही राशीच्या लोकांना फायदेशीर असणार आहे. सूर्य मिथुन राशीमध्ये 15 जून रोजी सकाळी 6.52 वाजता संक्रमण करणार आहे. मिथुन राशीमध्ये सूर्य आणि गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे मिथुन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर होतो. उदाहरणार्थ – करिअर, सामाजिक कार्य, आर्थिक परिस्थिती इत्यादी गोष्टींवर या संक्रमणाचा परिणाम होऊ शकतो.
सूर्याच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा दिवस शुभ राहणार आहे. जर तुम्ही एखाद्या योजनेत किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणूक केली असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुमचा समाजात आदर वाढेल तसेच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा दिवस शुभ आहे. या लोकांना व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे तुम्ही विविध करार करु शकता.
सूर्याचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. या लोकांना अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. यावेळी सिंह राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअर क्षेत्रामध्ये अनेक लाभ होण्याची शक्यता आहे. या लोकांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
सूर्याचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना हा दिवस खूप फायदेशीर राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमची नवीन लोकांची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.
धनु राशीच्या लोकांना सूर्याचे हे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे त्या लोकांना अपेक्षित फायदा होईल. या लोकांनी एकमेंकावर विश्वास ठेवून तुमचे काम पूर्ण केल्यास मोठ्या प्रमाणावर तुम्हाला त्याचा फायदा होईल.
कुंभ राशीच्या लोकांना सूर्याच्या संक्रमणाचा परिणाम म्हणजे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना यश मिळते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. तसेच पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)