
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा स्वामी सूर्य देव वेळोवेळी आपली राशीच बदलत नाही तर नक्षत्र देखील बदलत राहतो. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. सूर्य देव आज गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. पंचांगानुसार, गुरुवार, 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.59 वाजता सूर्य आपले नक्षत्र बदलणार आहे, यावेळी तो स्वातीपासून विशाखा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरू आहे आणि त्याचे नक्षत्र तूळ आणि वृश्चिक राशींमध्ये पसरलेले आहे. सूर्याचे गुरु ग्रहाच्या नक्षत्रात होणारे संक्रमण महत्त्वाचे मानले जाते. या संक्रमणादरम्यान ज्ञान, आदर आणि कीर्ती मिळेल. तसेच या काही राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित बाबींमध्ये अपेक्षित यश मिळेल. त्यासोबतच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. सूर्याच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
सूर्याच्या संक्रमणानंतर मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तुमचे रखडलेले प्रकल्प पुढे जाऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला शांती मिळेल. या काळात तुमचे आरोग्य देखील अनुकूल राहील. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ राहणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबात आदरयुक्त वातावरण राहील. करिअरमध्ये तुमची अपेक्षित अशी प्रगती होईल. तुमचा आदर वाढल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा मजबूत होईल. नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तसेच तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. त्यासोबतच तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्साहाने परिपूर्ण राहाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक परिणाम देणारा राहणार आहे. या काळात तुमच्या प्रलंबित योजना पूर्ण होतील. संपत्तीमध्ये वाढ होईल. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील. नवीन गुंतवणूक किंवा मालमत्तेबाबतचा निर्णय तुमच्या बाजूने काम करू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे खूप मेहनत घेतल्यास अपेक्षित यश मिळेल. नवीन लोकांच्या ओळखीचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. या काळात आरोग्य चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)