फोटो सौजन्य - Social Media
महाभारतात गुरु द्रोणाचार्य एक तेजस्वी पुरुष म्हणून पाहिले जातात. भारद्वाजांचे पुत्र असणारे गुरु द्रोण अश्वत्थामा यांचे वडील होते. त्यांनी त्यांचे बहुतेक आयुष्य वनात घालवले. वनात असताना ते ऋषी पुत्र दुप्रद यांच्यासमवेत खेळायचे. दुप्रद द्रोण यांच्याच गुरुकुलात शिकत होता. त्यांचे वडील त्याचे गुरु होते. पुढे, दुप्रद राजा झाला. एकदा, द्रोण दुप्रदाच्या राज्यात त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा द्रोणला त्याने हाकललं. द्रोणाला याचा फार राग आला. पुढे, द्रोण हस्तिनापूरच्या वनात जाऊन त्यांनी तिथे खेळणाऱ्या कुरुवंशी राजपुत्रांना त्यांचे अस्त्र शस्त्रकला दाखवली.
कुरुवंशाच्या त्या राजपुत्रांना त्यांच्या गुरुकुलात जाण्याचा हट्टच धरला. पांडव आणि कौरव, दोघेही द्रोणांच्या आश्रमात शिकू लागले. तसेच जेव्हा गुरुदक्षिणा घेण्याची वेळ आली तेव्हा द्रोणांनी दुप्रदचा स्वाभिमान मागितला. कौरव आणि पांडवांनी, दुप्रदच्या राज्यविरोधात युद्ध जिंकून त्याचे राज्य दक्षिणा म्हणून द्रोणांना आणून दिले. द्रोणांनी तरी दुप्रदला माफ करून त्याला त्याचे अर्धे राज्य दिले आणि अर्धे राज्य स्वतःकडे ठेवले. पण द्रोण कधीच त्या राज्यात जाऊन राजे झाले नाहीत ते हस्तिनापूरच्या वनातच राहू लागले.
पण युद्धात त्यांनी केलेली क्रूरता, त्यांच्या मृत्यूचे कारण बनले. चक्रव्यूहात अर्जुनाचा वंश अभिमन्यूला अडकवला तितके युद्ध नियमानुसार उचित आहे. याउलट अभिमन्यूने त्या चक्रव्यूहात केलेला पराक्रम, शेकडो रथींना एकट्याने दिलेली टक्कर पाहून द्रोण खुश झाले. पण जेव्हा अभिमन्यू सगळ्यांना पुरून उरत होता तेव्हा द्रोण, कर्ण, शल्य अशा अनेक धुरंधरांना एकत्र येऊन अभिमन्यूची निर्घृण हत्या करावी लागली.
या हत्येला द्रोण जबाबदार असल्याचे कळताच आसपासचे सप्तर्षी मंडळी त्या रणांगणावर येऊन पोहचले आणि त्यांनी द्रोण यांनी केलेल्या कुकर्मामुळे माघार घेण्याची आज्ञा दिली. द्रोण यांनाही त्यांच्या अधर्माची जाणीव होती मग त्यांनी सुरु युद्धात मौन पत्करले आणि ध्यान करत बसले याचा फायदा पांडवांनी घेतला आणि त्यांचा शिरच्छेद केला.






