असं म्हणतात की, जोड्या स्वर्गात बनतात. लग्न संस्थेला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंब एकमेकांशी जोडतं. त्यामुळे गोत्र, जन्मपत्रिका, गुणमिलन , कुळ या सगळ्याचा विचार केला जातो. लग्न ठरवताना ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की प्रत्येक रास ही इतर राशींच्या मित्र राशी आँणि आहेत त्याचप्रमाणे शत्रुराशी देखील आहेत. म्हणूनच कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या राशीचा जोडीदार निवडावा याबाबातची माहिती ज्योतिषशास्त्रात सांगितलेली आहे.
काही राशींच्या जोड्या इतक्या समरस आणि परिपूर्ण मानल्या जातात की त्यांचं नातं केवळ पती पत्नीचं नाही तर मित्र मैत्रिणीप्रमाणेच ते एकमेकांशी विश्वासाने राहतात. अशा राशी आहेत ज्यांच्या जोड्या सामान्यतः ‘स्वर्गात जुळलेल्या’असतात असं म्हटलं जातं.
मेष
मेषेची मंडळी ही अत्यंत धाडसी आणि शिस्तप्रिय स्वभावाची असतात. या मंडळींना सिंह आणि धनू राशीचा जोडीदार परिपूर्ण आहे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. सिंह आणि धनू या राशीची माणसं देखील स्पष्टवक्ते असतात ही मंडळी देखील समोरच्याला आदर आणि सन्मान देतात त्यामुळे मेषेच्या माणसांचं या राशीच्या व्यक्तींशी चांगलं जमतं.
वृषभ
वृषभेची माणसं शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे ही माणसं मनमिळावू निष्ठावान आणि प्रेमळ असातात. त्यामुळे कन्या, मकर आणि तूळ राशीचे जोडीदार यांना मेड फॉर इच अदर आहेत. कन्या, मकर आणि तूळ या राशीच्या स्थैर्य, निष्ठा आणि व्यवहारिक दृष्टिकोन आहेत . हे दांपत्य शांत, समजूतदार आणि एकमेकांचे आधार बनते.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींचं संवाद कौैशल्य उत्तम असतं. विचारांची देवाणघेवाण आणि मानसिक जुळवाजुळ ही तूळ आणि कुंभ राशींच्या मंडळींशी जास्त होते.
मिथुन राशीची मंडळी तूळ आणि कुंभच्या लोकांसोबत खूप आनंदात जगतात.
कर्क
या राशीचा स्वामी चंद्र असल्याने ही माणसं प्रचंड भावनाशील असतात. यांना कोणाशीही ओरडून वागणं जमत नाही. या राशीला समजून घेणाऱ्या राशी म्हणजे वृश्चिक आणि मीन. कर्क राशीशी या दोन्ही राशींचा भावनिक बंध मजबूत आहे. त्यामुळे संसार करताना ही माणसं आपल्या जोडीदाराला जास्त सांभाळून घेतात.
सिंह
सिंह राशीची माणसं जोडीदाराप्रती निष्ठावान असतात. या माणसांना मेष आणि धनू राशीचा जोडीदार योग्य ठरतो. या दोन्ही राशीची मंडळी सिंह राशीच्या जोडीदाराला खूप चांगलं समजून घेतात.
कन्या
कन्या राशीची मंडळी मनाने प्रेमळ असतात. या राशीच्या मंडळींना वृषभ आणि मकर राशीचे जोडीदार खूप चांगलं सांभाळून घेतात.
तुळ
ही माणसं व्यक्तीमत्वाने समतोल, संवादप्रिय आणि आकर्षक असतात. कोणतंही नातं ही माणसं जबाबदारीने आणि मनापासून निभावतात.या राशीची मंडळी जोडीदाराशी मित्रासारखं वागतात. या राशीच्या मंडळींना मकर , कुंभ आणि वृषभ राशीचे जोडीदार कायम साथ देतात.
वृश्चिक
कर्क आणि मीन राशीच्य़ा मंडळींशी वृश्चिक राशीचं चांगलं जमतं. त्याचबरोबर वृश्चिकची माणसं निष्ठावान आणि प्रेमळ स्वभावाची असतात. एकमेकांसाठी प्रेम काळजी आणि आपुलकी .या मंडळींना असते.
धनू
साहसी, मुक्त आणि सकारात्मक जोड. प्रेमाच्या नात्यात ही मंडळी साहसी, मुक्त आणि सकारात्मक जगण्याचा कल ठेवतात. ही माणसं प्रेमाच्या माणसांबरोबर आयुष्य आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगतात.मेष आणि सिंह राशीची माणसं यांचे चांगले जोडीदार ठरतात.
मकर
जबाबदार, परिश्रमी आणि दीर्घकालीन नातं टिकवणारी माणसं म्हणजे मकर राशीची.यांना वृषभ आणि कन्या राशीचा जोडीदार अनुकूल ठरतो. हे दांपत्य लक्ष्मी-नारायणासारखं स्थिर आणि समृद्ध मानलं जातं.
कुंभ
विचारशील, आणि मानसिकरित्या स्थिर असलेली माणसं म्हणजे कुंभ राशीची. यांना समजून घेणारी विवेकशील माणसं म्हणजे तूळ आणि मिथुन राशीची.
मीन
कर्क आणि वृश्चिक राशीचं मीन राशीशी खूप चांगलं पटतं. या जोड्यांचे बंध खरोखर “स्वर्गात जुळलेले” असतात.






