फोटो सौजन्य- pinterest
ऑक्टोबरचा महिना हा ग्रहांचे संक्रमण आणि इतर ग्रहांशी होत असलेल्या युतीमुळे हे संक्रमण खूप खास मानले जात आहे. यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी आहे. मात्र त्यापूर्वी सूर्य आणि मंगळ युतीत असतील. ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबरमध्ये सूर्य आणि मंगळ तूळ राशीमध्ये युती करतील. त्याचे परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतील. यंदा दिवाळीपूर्वी 13 ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल आणि 17 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजा सूर्यही तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीमध्ये मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे आदित्य मंगल राजयोग तयार होतो. या राजयोगामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, तर काही राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास झपाट्याने वाढलेला राहील. सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांमधील आदित्य मंगल राजयोग खूप शुभ मानला जातो. मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे तयार होणारा मंगल आदित्य राज योग तुमच्या कुंडलीमध्ये सातव्या घरामध्ये तयार होत आहे. या काळात तुम्हाला सुवर्णसंधी मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले व्यावसायिक काम पूर्ण होईल. या योगाच्या प्रभावामुळे तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे.
वृषभ राशीमध्ये मंगळ आणि सूर्याची युती खूप फायदेशीर राहील. या ग्रहांच्या युतीमुळे आदित्य मंगल राज योग या राशीच्या सहाव्या घरात होत आहे. तुम्हाला बऱ्याच काळापासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमधून दिलासा मिळू शकतो. चालू वादात अडकलेल्यांना दिलासा मिळेल. या काळात तुम्हाला करिअरच्या अनेक संधी मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना लक्षणीय यश मिळू शकेल. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आदित्य मंगल राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल. ज्यामुळे तुमच्या व्यवसायात आणि आर्थिक स्थितीत वाढ होईल. यावेळी तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. ज्या लोकांचे पैसे कुठे अडकले असल्यास ते परत मिळू शकतात. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. या काळात तुम्ही लांबचा प्रवास करावा लागू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)