फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचे संक्रमण आणि राशींमध्ये होणारे बदल याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसतो. सध्या, देवांचा गुरु, बृहस्पति, मिथुन राशीत आहे आणि राहू कुंभ राशीत असल्याने नवपंचम राजयोग तयार होत आहे. हा नवपंचम राजयोग 18 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे आणि त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. नवपंचम राजयोग 5 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. नवपंचम राजयोगचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. तर या तीन राशीच्या लोकांना या योगाचा जास्त फायदा होणार आहे. नवमपंचम योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
कर्क राशीच्या लोकांसाठी हा नवपंचम राजयोग फायदेशीर असणार आहे. या काळामध्ये गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. दरम्यान या काळात कोणतेही नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि धार्मिक विधी केले पाहिजेत. व्यावसायाशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या ऑफर मिळतील. धार्मिक बाबतीत तुम्ही सहभाग घेऊ शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या लोकांना अपेक्षित नफा मिळेल. राहूची स्थिती आणि त्याच्या वर गुरुची दृष्टी विवाहाच्या संधी निर्माण करत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. जिथे राहूची स्थिती आणि त्यावर गुरुची दृष्टी अचानक लग्नाची शक्यता निर्माण करू शकते. शेअर मार्केट आणि गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला या काळात अपेक्षित लाभ होईल.
मकर राशीच्या राशींना नवपंचम राजयोगाचा फायदा होईल. हा योग या राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. नोकरी शोधणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळेल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होतील. वडिलोपार्जित मालमत्तेमधून तुम्हाला फायदा होईल. जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीमध्ये सहाव्या घरात गुरु राहून नोकरी, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)