फोटो सौजन्य- pinterest
आज शुक्रवार, 25 जुलैचा दिवस. आजपासून श्रावण महिना देखील सुरु झाला आहे. आज दिवसभर चंद्र कर्क राशीमध्ये संक्रमण करणार आहे. आज दिवस शुक्र ग्रहाचा असल्याने त्याचे आज वर्चस्व राहणार आहे. चंद्र सूर्य आणि बुध ग्रहाच्या स्वतःच्या राशीत युतीत असेल. तसेच सिद्धी योगाचा प्रभाव पुष्य नक्षत्रातही असेल. आजचा शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असल्याने काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील तर काहींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच काही राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मकर राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होईल.
मेष राशीच्या लोकांचा आजचा श्रावणाचा पहिला दिवस चांगला असणार आहे. त्यासोबतच तुमचे व्यवसायातील नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. जर रिअल इस्टेट किंवा वाहतुकीशी संबंधित काम अडकले असतील तर ती आज पूर्ण होतील. मालमत्ते संबंधित वाद सुरु असल्यास दिलासा मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस शुभ असणार आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, अन्न पुरवठा इत्यादी व्यवसायाशी संबंधित लोकांना आज अतिरिक्त फायदे होऊ शकतात. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करु शकता. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा शुक्रवारचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून मेहनत घेत आहात त्यात तुम्हाला आज फायदा होईल. उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवारचा दिवस खूप खास राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन बदलांना सामोरे जावे लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. ज्या लोकांना नोकरीत बदली पाहिजे आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप खास असणार आहे. या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. जर तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जोडीदाराच्या मदतीने तुम्ही नवीन योजनांवर काम करु शकतात. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)