फोटो सौजन्य- pinterest
आज 25 जुलैचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी खास असेल. आज शुक्रवार असल्याने शुक्र ग्रहाचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. आज मूलांक 6 असलेल्या लोकांना वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आई वडिलांचा पाठिंबा मिळेल. जर सरकारी काम प्रलंबित असतील तर ती पूर्ण होतील. तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरी करणाऱ्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मानसिक तणाव वाढू शकतो. आज तुम्ही प्रवास करणे योग्य नसेल.
मूलांक 4 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगावी. व्यवसायामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका विचारपूर्वक घ्या. प्रवास करताना किंवा वाहन चालवताना काळजी घ्या. आज तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रम करू शकता.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. व्यवसायात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला कोणत्याही अनावश्यक आणि चुकीच्या कामापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल, अन्यथा तुमची प्रतिमा वाईटरित्या प्रभावित होऊ शकते. राजकारण किंवा प्रशासकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. राजकारण किंवा समाजसेवेत गुंतलेल्या लोकांना काही मोठा फायदा किंवा यश मिळू शकते. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)