
फोटो सौजन्य- pinterest
हनुमान चालिसामध्ये भक्तीभाव आहे, तर समर्थ रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रमध्ये शक्तीची उपासना आहे. हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्रातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा फरक म्हणजे भाषेचा आहे. हनुमान चालिसा अवधी भाषेत लिहिली गेलीय, तर मारुती स्तोत्र मराठीत. काही दशकांच्या अवधींच्या फरकात वावरलेल्या दोन संतांनी या दोन्ही रचना लिहिल्यात.
संत तुलसीदासांनी हनुमान चालिसा, तर संत रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिलंय. यापलिकडे या दोन्ही रचनांमध्ये काय फरक किंवा साम्य आहे, हे आपण जाणून घेऊया.
हनुमान चालिसा संत तुलसीदासांनी लिहिली आहे. हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालिसाचं मूळ लेखन करण्यात आले आहे. तुलसीदास जन्मस्थान हे आताच्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे. तुलसीदासांनी भारतभर भ्रमंती केल्याचे सांगितले जाते.
श्रीरामरचितमानस ही त्यांच्या नावावरील प्रसिद्ध रचना आहे. त्यामुळे हनुमानावरही त्यांनी लिहिलं आहे. जे आज प्रत्येक हनुमान भक्ताच्या ओठांवर असतं पण भारतातील इतर भाषेतही भाषांतरीत झाली आहेत. त्यामुळे सर्वत्रच बोलली जाते. महाराष्ट्रात मात्र हनुमान चालिसाऐवजी मारुती स्तोत्रालाच प्राधान्य दिलं जात आहे असं दिसून येतं. कारण मारुती स्तोत्र मराठीत असून अगदी सोप्या मराठी भाषेत आहे. कुठलीही भीती वाटल्यास हनुमान चालिसा म्हटली जाते. हनुमान चालिसा म्हटल्यास मनातली भीती निघून जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
हनुमान चालिसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई आहेत. हे एकूण 40 चौपाई किंवा श्लोक आहेत. म्हणूनच हनुमान चालिसा म्हटलं जातं, असंही अनेकांचं म्हणणं आहे.
जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
अशी हनुमान चालिसाची सुरुवात आहे. या सुरुवातीआधी दोन दोहे आहेत.
एकूणच मारुती स्तोत्र 17 व्या शतकात, तर हनुमान चालिसा 16 व्या शतकात लिहिली गेलीय.
मारुती स्तोत्र हे 17 व्या शतकात लिहिलं गेलंय. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्राचं लेखन केलंय. मारुती म्हणजे हनुमान. त्यामुळे मारुती किंवा हनुमानाच्या गुणांची स्तुतीपर रचनाच मारुती स्तोत्रात दिसून येते.
‘भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती…‘ या ओळीने मारुती स्तोत्राची सुरुवात होते.
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मारुती मंदिरं स्थापन केली. त्या काळात मोठ्या भूभागावर मुघलांची सत्ता होती आणि अशावेळी लोकांना शक्तीची उपासना शिकवण्याची गरज निर्माण झाली होती. याकरिता समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचं स्तोत्र लिहिलं. बलोपासना दिली, आत्मबळ जागृत केलं त्यामुळे शक्तीहीन झालेल्या तत्कालीन लोकांच्यात एक प्रकारची उर्जा निर्माण होऊन पुढे हेच लोक शिवाजी महाराजांना सैनिक म्हणून लाभले. भक्ती आणि शक्तीचा तो मिलाप होता.
आपण मारुती स्तोत्राच्या सुरुवातीस शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न संत रामदास स्वामींचा आहे.
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||
महाराष्ट्रात प्रामुख्यानं मारुती स्तोत्राचं पठण होत असल्याचं दिसून येतं. आपण जसजसे उत्तरेकडे जातो, तसतसं हनुमान चालिसाचे पठण होताना दिसून येते. हे स्तोत्र गेय आणि मराठीत असल्यामुळे म्हणायला, पाठ व्हायला अत्यंत सोपं आहे.
संत तुलसीदासांच्या हनुमान चालिसामध्ये भक्तीभाव आहे, तर समर्थ रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रमध्ये शक्तीची उपासना आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हनुमान चालीसा ही संत तुलसीदासांनी रचलेली हिंदी स्तोत्रमाला आहे, जी हनुमानाच्या भक्तीसाठी पठण केली जाते. मारुती स्तोत्र हे मराठी भाषेत लिहिलेले स्तोत्र असून हनुमानाच्या शक्ती, संरक्षण आणि संकट निवारणावर भर देते.
Ans: हिंदी वाचन जाणणाऱ्यांसाठी हनुमान चालीसा उपयुक्त आहे; मराठी भाषिकांसाठी मारुती स्तोत्र सोयीस्कर व अधिक अर्थपूर्ण ठरते.
Ans: दोन्ही स्तोत्र हनुमानाची कृपा, संकट निवारण, वैभव, आणि मानसिक स्थैर्य देतात. पठण भक्तीची प्रगाढता वाढवते आणि जीवनातील अडचणी दूर करतो.