
फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 31 डिसेंबरचा दिवस सूर्यासोबत युती होत असल्याने बुधादित्य योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे वृषभ राशीत संक्रमण होत असल्याने गौरी योग तयार होणार आहे. तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी कृतिका नक्षत्रामुळे अनेक शुभ योग तयार होत आहे. ज्यामुळे साधी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि त्रिपुष्कर योग यांचा समावेश होणार आहे. अशा वेळी त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
बुधवारी वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कुठूनतरी अचानक आर्थिक लाभ होईल. तुम्ही मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदाने वेळ घालवू शकाल. तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. यावेळी तुम्ही जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो.
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. हॉटेल आणि किराणा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकते. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला मदत करू शकेल. बेकरीच्या कामात गुंतलेल्यांना अपेक्षित यश मिळेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्रोतांकडून लाभ मिळतील. कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला भेटवस्तू मिळाल्याने तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळेल. उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित नफा देखील मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदा होऊ शकतो. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईक भेटून आनंद होईल. एखाद्या इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. हॉटेल आणि बेकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पाठिंबा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)