
फोटो सौजन्य: Gemini
भारताच्या आजवरच्या इतिहासात अनेक घनघोर युद्ध झाले. असेच एक युद्ध म्हणजे कुरुक्षेत्रावर घडलेले महाभारत! असे म्हणतात महाभारताचे युद्ध तब्बल 18 दिवस चालले. या युद्धात न जाणो कित्येक वीरांनी आणि सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे युद्ध फक्त कौरव विरुद्ध पांडव असे नसून धर्म विरुद्ध अधर्म असे होते. या युद्धात दोन्ही बाजूने नियमांचे उल्लंघन करण्यात आले. जिथे अभिमन्यूवर एकाच वेळी अनेकांनी वार करत युद्धातील नियमांना धाब्यावर बसवले. तसेच पांडवानी सुद्धा गुरु द्रोणाचार्य, पिताम्हा भीष्म आणि कर्णाला नियमांचे उल्लंघन करत मारले. त्यामुळेच महाभारताचे युद्ध आपल्या सांगते की ‘उद्घटाशी उद्धटच वागावे!’
महाभारताचे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला. अगदी श्रीकृष्णाने सुद्धा हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले पण त्याचा देखील काही उपयोग झाला नाही. परिणामी युद्ध घडले आणि न जाणो कित्येकांनी आपले रक्त सांडले. मात्र, हेच युद्ध धर्मराज युधिष्टिर थांबवू शकत होता असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर! होय, हे खरं आहे. युधिष्टिराने जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असता तर नक्कीच महाभारताचा इतिहास काही और असता. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कुरुक्षेत्राच्या महायुद्धापूर्वी अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे पांडवांना साम्राज्य परत मिळवण्याची आणि कौरवांना धडा शिकवण्याची सुवर्णसंधी मिळू शकली असती. मात्र, युधिष्ठिराने योग्य क्षणी राजकीयदृष्ट्या योग्य निर्णय घेतला नाही.
महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा
एका संघर्षात देवतांनी कौरवांना पराभूत करून त्यांना कैद केले होते. त्या वेळी पांडवांनी फक्त तटस्थ राहिले असते, तर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकली असती. पण पांडवांनी तसे न करता स्वतः कौरवांविरुद्ध युद्ध करायची तयारी ठेवूनही, कौरव देवतांच्या कैदेत गेल्यावर त्यांना सोडवण्यासाठी देवतांवरच हल्ला केला. तेव्हा कौरवांकडून राज्य मिळवले असते किंवा देवतांविरुद्ध न उभे राहता तटस्थ राहिले असते, तर कुरुक्षेत्राच्या युद्धाचा रक्तपात टाळता आला असता.
एकदा कर्ण कौरवांसोबत वनविहारासाठी गेला. तिथे गंधर्व आधीपासून उपस्थित होते आणि आपल्या चर्चेत गुंग होते. त्यांना कौरवांशी बोलण्यात रस नव्हता. सरोवराजवळ थांबण्याची इच्छा दुर्योधनाने व्यक्त केली आणि उर्मट वृत्तीत त्याने सैनिकांना गंधर्वांवर हल्ला करण्याचा आदेश दिला. कौरवांची सेना आक्रमण करू लागल्यावर गंधर्वही प्रतिकारासाठी सज्ज झाले आणि भीषण युद्ध सुरू झाले. कौरवांना वाचवण्यासाठी कर्ण पुढे आला, पण भलतेच घडले!
गंधर्वांशी झालेला संघर्ष कर्णावर उलटला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो रणांगण सोडून पळू लागला. कर्ण पळताना दिसताच त्याच्या पाठोपाठ कौरवांची सेना देखील पळाली. शेवटी दुर्योधन एकटाच उरला. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तोही पराभूत झाला.
दुःशासन आणि दुर्योधन दोघांना गंधवांनी कैद केले. दोघे कौरव कैद झाल्यानंतर कौरवांचे घाबरलेले सैन्य थेट पांडवांकडे आश्रयाची याचना करू लागले. अशावेळी जर पांडव तटस्थ राहिले असते तर त्यांना त्यांच्या हक्काचे राज्य युद्ध न करता मिळाले असते. मात्र, कधी नव्हे ते युधिष्टिराच्या मनात बंधुप्रेम जागे झाले आणि त्याने थेट अर्जुनाला कौरवांची सुटका करण्यासाठी पाठवले. पुढे जे होणार होते तेच झाले. कौरव पांडवांची मदत विसरले आणि महाभारताचे युद्धा घडले.
वरील माहिती ही समर प्रकाशनच्या ‘महाभारतातील १०८ अद्भुत रहस्ये’ या पुस्तकातून घेतली आहे.