घरात मांजराने पिल्लाला जन्म देणे शुभ की अशुभ?
आपल्या व्यतिरिक्त घरात असे अनेक जीव राहतात, ज्यांची उपस्थिती ज्योतिषशास्त्रात शुभ आणि अशुभ मानली जाते. प्राण्यांपैकी कोणता प्राणी घरात असावा याचेही काही नियम आहेत. पण काही घटना घरात घडणं योग्य किंवा अयोग्य ठरू शकतं. त्यापैकी यातील एक घटना म्हणजे मांजरीने पिल्लांना जन्म देणे.
वास्तविक, कुत्रा हा माणसासाठी सर्वात विश्वासू प्राणी मानला जातो, परंतु मांजराबाबत धर्मग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. मांजर भविष्यातील घडामोडींचा अंदाज लावू शकते, असे तुम्ही आमच्या वडिलांकडून अनेकदा ऐकले असेल. मांजरी पाळण्याबाबत लोकांची दोन्ही प्रकारची मते आहेत. काही लोक मांजर पाळणे शुभ मानतात तर काही लोकांच्या मते मांजर घरात नकारात्मकता आणि अशुभ आणते. अशा परिस्थितीत मांजर पाळणे शुभ की अशुभ? मांजर कोणता रंग दर्शवते? किंवा तिने पिल्लांना जन्म देणे कितपत योग्य? याबाबत उन्नावचे ज्योतिषी पंडित ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांनी एका हिंदी वेबसाईटला महत्त्वाची माहिती दिली आहे. आपणही जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
वास्तुशास्त्रानुसार मांजर अशुभ
मांजरांचा जन्म घरात होणं शुभ ठरते की अशुभ
ज्योतिषी ऋषिकांत मिश्रा सांगतात की घरात मांजर पाळणे अशुभ आहे, कारण मांजर जिथे राहते तिथे नकारात्मक शक्ती आणि ऊर्जा सक्रिय होतात. याशिवाय घरात मांजर असल्यामुळे राहु तत्वदेखील सक्रिय होते. त्यामुळे मांजर ज्या घरात आहे अशा व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हेदेखील वाचा – घरात पक्षी येणे शुभ की अशुभ ते जाणून घेऊया
सोनेरी मांजर शुभ
तपकिरी रंगाचे मांजर शुभ
घरात सोनेरी रंगाची मांजर असणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की अशी मांजर तुमच्यासाठी घरात शुभ गोष्टी आणि सकारात्मकता आणते. तसेच, घरात तपकिरी मांजरीच्या आगमनाने, संपत्तीचे इतर मार्गदेखील उघडू शकतात. एवढेच नाही तर तुमचे प्रलंबित काम यशस्वी होते आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतील.
काळे मांजर
मान्यतेनुसार, जर अचानक एखादे काळे मांजर तुमच्या घरात आले आणि रडू लागले तर ते शुभ लक्षण मानले जात नाही. अशा पद्धतीने काळे मांजर आल्यास एखाद्या अप्रिय घटनेचे किंवा वाईट बातमीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे तुम्ही सावध होण्याची गरज आहे. वास्तुशास्त्रानुसार काळे मांजर हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
हेदेखील वाचा – नारळ आतून खराब निघणे शुभ की अशुभ?
पिल्लाचा जन्म शुभ की अशुभ?
पिल्लांचा जन्म
जर तुमच्या घरात मांजरीने बाळाला जन्म दिला तर ते घराच्या प्रमुखासाठी खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की 90 दिवसात कुटुंबातील सदस्य प्रगती करू शकतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. घरात मांजरीचे पिल्लू जन्माला आल्याने नकारात्मक शक्तीही घरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घरात मांजर असेल आणि ते पिल्लांना जन्म देणार असेल तर ते तुमच्यासाठी नक्कीच शुभ ठरू शकते असे पंडितजींनी सांगितले.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.