फोटो सौजन्य - social media
हिंदू धर्मात नारळाला एक विशिष्ट दर्जाचे मान आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात नारळ हा लागतोच. हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ म्हणून संबोधले जाते. हिंदू दिनदर्शिका शालिवाहन शकेतील मार्गशीर्ष महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने महालक्ष्मीची उपासना केली जाते. यावेळी अनेक घरांमध्ये श्रीफळाला देवीचे स्वरूप देऊन त्याला पुजले जाते. एकंदरीत, प्रत्येक देवाला पूजेप्रसंगी नारळ लागतोच. नारळाला अतिशय असे महत्व हिंदू धर्मात दिले गेले आहे. हिंदू धर्मात नारळ प्रसाद म्हणूनही वाटला जातो.
हिंदू धर्मात नारळाला देवी लक्ष्मीचा प्रतीक मानलं गेलं आहे. यामुळेच पूजेमध्ये नारळ असणे आवश्यक आहे. नारळ फोडल्यावर जर तो आतून खराब निघाला तर त्याचा अर्थ देवाने तो प्रसाद म्हणून स्वीकारला आहे, असा समज आहे. यामुळेच जर नारळ आतून सुकून गेला असेल किंवा नारळ आतून खराब असेल तर हे अशुभ नसून शुभ आहे. हि क्रिया देवाचे संकेत असते की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता फोडलेला नारळ जर आतून खराब असला तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही, याउलट ही क्रिया शुभ असते.
देवाला प्रसाद म्हणून चढवलेला नारळ फोडल्यावर स्वच्छ व व्यवस्थित निघत असेल तर तो प्रसाद सर्वांना वाटावा. प्रसाद वाटणे हे पुण्याचे काम असते तसेच शुभ कार्य असते. चूकुन खाली सांडलेला प्रसाद पक्ष्यांच्या नावे अर्पण केल्याने पुण्यप्राप्ती होते. आता पुढच्या वेळी नारळ फोडताना तो खराब निघाला तर घाबरण्याची किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे देवाकडून आलेले हे संकेत असते, हे समजून घ्या.
( ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी. )