फोटो सौजन्य- pinterest
वास्तूशास्त्रामध्ये स्वयंपाकघराला विशेष महत्त्व आहे. मात्र स्वयंपाकघरातील ओट्याचा रंग काळा असल्यास वास्तूदोष निर्माण होऊ शकतो याचा परिणाम घरातील महिलांवर होऊ शकतो. स्वयंपाकघरातील ओट्याचा रंग कोणता असावा, जाणून घ्या
प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार घर बनवतं. घराच्या भिंतीचा रंग, खिडक्या आणि दरवाजे काचेचे असावेत की लाकडाचे, स्वयंपाकघरामधील कपाट तसेच ओट्यांचा रंग कसा असावा, या सर्व गोष्टींचा विचार करुन आपण बनवले जाते. दरम्यान, काही लोक घर खरेदी करताना किंवा बांधताना वास्तूची अत्यंत काळजी घेतात. अशा काही चुका केल्यास जीवनामध्ये सुख समृद्धी, लाभ, समृद्धी मिळण्याऐवजी अनेक समस्या निर्माण होतील.
बहुतेक घरामध्ये ओट्यांचा रंग काळा असतो. वास्तुशास्त्रानुसार, ओट्यांचा रंग काळा असणे हे चुकीचे मानले जाते. काळा रंगाचा संबंध शनि ग्रहांशी संबंधित मानला जात असल्याने त्याला अशुभतेचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, काळ्या रंगाचे स्लॅब ठेवू नयेत. काळे स्लॅब नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.
असे म्हटले जाते की, ओट्यांचा रंग काळा असल्यास म्हणजे त्यांचा संगमरवर ताबडतोब बदलून घ्या अन्यथा जीवनामध्ये काही ना काही त्रास होतो किंवा अनेक समस्या उद्भवतात. याचा अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होत असतो.
ज्या घरांमध्ये ओट्यांचा रंग काळा असल्यास त्या लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ओट्यांच्या या रंगामुळे घरातील महिलांना सतत समस्येचा सामना करावा लागू शकतो. तसेच त्यांना डोळ्यांच्या समस्या देखील उद्भवू शकतात. जसे की, मोतिबिंदू होणे, गुडघ्याच्या समस्या यांसारख्या आजारांना बळी पडू शकतात. ज्या लोकांचा ओट्याचा रंग काळा असतो त्यांना आर्थिक नुकसान, भांडणे यांसारख्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागतील.
घरामध्ये काळा रंगांचा ओटा असल्याने अनेक समस्या येत राहतात तो बदलणे फायदेशीर असते. यामुळे घरामध्ये नकारात्मकता देखील राहते. स्वयंपाकघरामध्ये अग्नी असतो ज्याच्या मदतीने अन्न शिजवले जाते. मात्र काळा रंग तमसाचे प्रतीक असल्याने तो विरोध दर्शवितो.
घरासाठी रंगांची निवड करताना ओट्याचा स्लॅब काळ्या रंगाऐवजी ऑफ-व्हाइट किंवा इतर कोणत्याही रंगांचा निवडणे योग्य राहील. यामुळे घरामध्ये कोणत्याही समस्या येणार नाही. तुम्ही पिवळा, पांढरा, हिरवा, तपकिरी रंग देखील निवडू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)