फोटोा सौजन्य- istock
आजचा बुधवारचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. कारण आज या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस भावनांनी भरलेला राहील. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील. तर मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. मूलांक 1 ते 9 असणार्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रलंबित असलेली तुमची कामे पूर्ण होतील. फक्त कोणतेही निर्णय घेताना हुशारीने घ्यावे लागतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. तुम्ही कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नातेसंबंधामध्ये समजूतदारपणा ठेवला पाहिजे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमचे विचार स्पष्टपणे मांडावे.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा असेल. हे लोक नवीन कामाची सुरुवात करु शकता त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून प्रेरणा किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, लेखन किंवा अध्यापन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर आहे.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल. या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. काही निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. कोणतेही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कोणत्याही करारात किंवा महत्त्वाच्या बैठकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही आज व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या जोडीदारासाठी आणि प्रियजनांसाठी वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस संघर्षाचा राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय अचानक घ्यावे लागू शकतात. काही वेळा शांत राहून निर्णय घ्यावे लागू शकतात. मानसिक शांती मिळेल. व्यवसायात यश मिळेल.
मूलांक 8 असणारे लोक आज दिवसभर व्यस्त राहतील. या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागू शकते. कोणताही निर्णय घेताना घाई करु नका नाहीतर नुकसानाला सामोरे जावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यावर संयम ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)