फोटो सौजन्य- pinterest
जीवनामध्ये अर्ध्या समस्या या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असतात. बरेच जण देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. देव आणि निसर्गाचे खोल नाते असल्याचे म्हटले जाते.
मान्यतेनुसार, क्रॅसुला वनस्पती हे देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. तसेच तुळशीला देखील विशेष स्थान आहे. पण काही वनस्पती खूप खास असतात. त्या वनस्पती देवी लक्ष्मीला खूप आवडतात. त्यासोबतच या वनस्पती इतर देवतांच्या देखील प्रिय असतात. या वनस्पतीचा संबंध शुक्र ग्रहांशी देखील संबंधित असतो.
वास्तुशास्त्रामध्ये गुलाबाच्या फुलाला प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल खूप आवडते. गुलाबाच्या फुलांच्या सुगंधाचा थेट संबंध शुक्र ग्रहांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. वास्तुशास्त्रात या रोपाला विशेष महत्त्व आहे. घरात कोणत्या दिशेला गुलाबाचे रोप लावावे, जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबपाणी आणि गुलाबाच्या अत्तराचे असे अनेक उपाय घरामध्ये केले जातात. घरामध्ये हे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. तसेच घरामध्ये सौंदर्य आणि सुगंध घरात दळवतो त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढून संपत्ती आकर्षित करते.
वैवाहिक जीवनासाठी गुलाबाचे फूल खूप महत्त्वाचे असल्याचे वास्तुशास्त्रात म्हटले आहे. ज्याचा वापर आपण बेडरुममध्ये गुलाबाच्या पाकळ्याशी संबंधित असल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
गुलाबाचे रोप घरामध्ये नैऋत्य दिशेला लावणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये लाल गुलाब लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते, त्यामुळे घरात प्रवेश करते.
वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात उल्लेख केल्यानुसार, शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करावे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जी व्यक्ती देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करते त्या व्यक्तीला कधीही पैशांची समस्या भासत नाही.
जर घरामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.
घरामध्ये गुलाबाचे रोप लावल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
गुलाबाचे रोप घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास कुटुंबामध्ये सुख समृ्द्धी, शांती राहते, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)