फोटो सौजन्य- pinterest
आज 6 जुलै रोजी चंद्र तूळ राशीमधून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आज रविवार असल्याने यावर सूर्याचे वर्चस्व राहील. तर आज रवी योग देखील तयार होत आहे. त्याचबरोबर मिथुन राशीमध्ये सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे गुरु आदित्य योग तयार होत आहे आणि सधी योग देखील तयार होत आहे. त्याचबरोबर विशाखा नक्षत्रामुळे त्रिपुष्कर योग तयार होत आहे. ग्रह आणि नक्षत्राची हालचाल बघता ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या हा दिवस खूप चांगला आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आज आहे. यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये फायदे होऊ शकतात. त्यामुळे आजचा रविवारचा दिवस तूळ राशीसह इतर राशींसाठी कसा असेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना इच्छित काम किंवा बदली मिळू शकते. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल. व्यवसायामध्ये एकत्र काम केल्यास तुम्हाला फायदा होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले गेल्यास आजचा दिवस अनुकूल राहील. जोडीदारासोबत तुमच्या नात्यात गोडवा राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या जवळच्या मित्रांची तुमची भेट होईल. सर्जनशील काम करणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस अनुकूल राहणार आहे. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, ट्रान्सपोर्ट इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस विशेषतः फायदेशीर ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. तुमचा आदर आणि सन्मान वाढेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमच्यावर जबाबदाऱ्या येऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल्स, लॅब्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. आज या लोकांना नशिबाची साथ लाभेल. तुमचे कुठेतरी पैसे अडकले असतील तर ते परत मिळतील. तुम्हाला कामानिमित्त बाहेर जावे लागू शकते. प्रशासनात काम करणाऱ्यांना चांगले फायदे मिळू शकतात. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)