फोटो सौजन्य- istock
वास्तुशास्त्रानुसार देव्हारा केवळ श्रद्धा आणि भक्तीचे स्थान नसून ते सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. तसेच शक्तीचे केंद्र देखील मानले जाते. घरातील देव्हाऱ्यामध्ये धूप, दिवे, अगरबत्ती आणि फुले अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मात्र या गोष्टी ठेवताना योग्य दिशेचा आणि नियमांचा वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे पूजेचा प्रभाव अधिक पटींनी वाढतो. वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्यात धूप, दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी योग्य दिशा आणि नियम काय आहेत, जाणून घ्या
देव्हाऱ्यात दिवा नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावा. पूजा करतेवेळी दिव्याची ज्योत नेहमी पूर्व दिशेकडे असावी. संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे दिवा लावताना दुसरा दिवा वापरला जाणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. तुळशीजवळ किंवा मंदिरात दिवा लावण्यासाठी आपण जळलेल्या दिव्याचा वापर करतो. जर तुम्ही अशी चूक केल्यास तुम्हाला पूजा केल्याचा फायदा होत नाही.
देवाच्या किंवा फोटोच्या समोर अगरबत्ती लावताना नेहमी उजव्या बाजूला लावावी. आग्नेय दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. विझलेल्या ठिकाणी अगरबत्ती ठेवल्यास घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करु शकते. मातीची राख पडत असल्यास खाली भांडे लावून ठेवा. अगरबत्ती लावण्यासाठी नेहमी आगीच्या काडीचा वापर करावा दुसऱ्या दिव्यांवरुन कधीही अगरबत्ती लावू नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
देवाला फूल अर्पण करताना नेहमी ताजी आणि सुंगधित फुले अर्पण करावीत. देव्हाऱ्यामध्ये कधीही वाळलेली किंवा तुटलेली फुले देवाला अर्पण करु नये. देवाला फूल अर्पण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी. बेलपत्र, तुळशी आणि कमळाची फुले यांसारख्या फुलांचा वापर करणे सर्वोत्तम मानले जाते. देवाला फूल वाहिल्यानंतर ती एका दिवसामध्ये बदलली गेली पाहिजे. देव्हाऱ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी अर्पण केलेली फुले दररोज बदलत राहणे चांगले मानले जाते.
वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार, देव्हाऱ्यात वस्तू ठेवताना योग्य दिशा आणि नियमांचे पालन केल्याने घरामध्ये आनंद, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. त्यासोबतच दिवे, अगरबत्ती आणि फुले केवळ भक्ती वाढवतातच असे नाही तर वातावरण शुद्ध आणि पवित्र देखील बनवतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)