फोटो सौजन्य- pinterest
वत्स द्वादशीला सनातन धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. मुलांच्या रक्षणासाठी हे व्रत पाळले जाते. तसेच, ज्या महिलांना मुले होण्यास विलंब होत आहे त्या देखील हे व्रत पाळतात. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची देखील पूजा केली जाते. तसेच श्रीकृष्णांची देखील पूजा केली जाते. मान्यतेनुसार, द्वादशी तिथी भगवान विष्णूंना खूप प्रिय मानली जाते. त्यामुळे द्वादशी तिथीचे महत्त्व आणखी वाढते. वत्स द्वादशी कधी आहे, काय आहे पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व ते जाणून घ्या
द्वादशी तिथीची सुरुवात मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3.33 वाजता सुरू झाली आहे आणि या तिथीची समाप्ती आज बुधवार, 20 दुपारी 1.59 पर्यंत राहील त्यानंतर त्रयोदशी तिथीची सुरुवात होईल. उद्यतिथीनुसार वत्स द्वादशी तिथीचे व्रत आज बुधवार, 20 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. हे व्रत पाळल्याने शुभ फळ मिळते, अशी मान्यता आहे.
वत्स द्वादशी तिथीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन देव्हारा स्वच्छ करुन घ्या. या दिवशी गाई आणि त्यांच्या वासरांची पूजा केली जाते, म्हणून या दिवशी गाय आणि वासराला नवीन कपडे अर्पण करा.
त्यानंतर सर्वांत पहिले गाईला टिळा लावा. नंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन श्रीकृष्णाचे ध्यान करा. तसेच गाईला पाणी अर्पण करा.
या दिवशी गाईला उडदापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री उपवास सोडावा.
या व्रताला सनातन धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. विवाहित महिला आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी कायम राहण्यासाठी हे व्रत करतात. तसेच, ज्या महिलांना मुले होऊ इच्छितात त्यांनी विशेषतः हे व्रत करावे. या दिवशी लोक हरभरा, अंकुरलेले मूग, मूग इत्यादी पदार्थ खातात. त्यासोबत देवाला नैवेद्य म्हणून हे पदार्थ अर्पण केले जाते. असे देखील म्हटले जाते की, या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी चाकूचा वापर करु नये. अशी देखील मान्यता आहे की, ज्या महिला उपवास करतात त्यांनी चाकूने कापलेले पदार्थ खाऊ नये आणि देवाला प्रसाद पण दाखवू नये.
गोवत्स द्वादशीच्या दिवशी भक्तीने उपवास केल्याने मुलांना दीर्घायुष्य मिळते, असे म्हटले जाते. तसेच कुटुंबामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहते. हे व्रत केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून कुटुंब आणि संस्कृतीशी देखील यांचा संबंध आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी वासरू आणि गाईची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि गाईच्या कृपेने जीवनात समृद्धी, आरोग्य आणि आनंद कायम टिकून राहते, असे देखील म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)