फोटो सौजन्य- pinterest
पूजा करताना घंटा वाजवणे हा भारतीय परंपरेमधील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. मग ते मंदिर असो की घरातील लहान देव्हारा. मात्र घंटा वाजवण्यापासूनच या विधीची सुरुवात होते. बऱ्याचला याला लोक धार्मिक विधी म्हणतात. परंतु यामागे काही वैज्ञानिक कारणे आणि फायदे देखील आहे. घंटा वाजवण्याचा संबंध केवळ धर्माशीच संबंधित नसून मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी देखील संबंधित आहे. या परंपरेमुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतात. वास्तूशास्त्रामध्ये पूजेदरम्यान घंटा वाजवणे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि त्याचे नियम पाळणे महत्त्वाचे मानले जाते. पूजा करतेवेळी घंटा वाजवण्यामागे कोणते कारणे आणि फायदे आहेत ते जाणून घेऊया
ज्यावेळी घंटा वाजवली जाते त्यावेळी घंटेचा आवाज सर्वत्र घुमतो. या प्रतिध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांत आणि सकारात्मक वातावरण तयार होते. घरातील वातावरण हे नेहमी हलके राहते आणि मन शांत होते. हा आवाज इतका शक्तिशाली असतो की घंटा वाजवण्याच्या काही सेकंदांनीही संपूर्ण दिवसाची ऊर्जा बदलू शकते.
जर पूजेदरम्यान मन स्थिर नसेल तर तर घंटेच्या आवाजामुळे आपले मन स्थिर होते. हा आवाज मेंदूला सक्रिय करतो आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. पूजेच्या सुरुवातीला आणि शेवटी घंटा वाजवणे शुभ मानले जाते. यामुळे प्रार्थना करताना लक्ष केंद्रित होण्यास मदत होते आणि त्याचा प्रभाव अधिक वाढतो.
जर घरामध्ये दीर्घकाळापासून अशांतता, तणाव किंवा संघर्ष जाणवत असेल तर नियमितपणे पूजा करताना घंटा वाजवणे खूप फायदेशीर आहे. यामुळे वातावरण शुद्ध होते आणि हळूहळू नकारात्मक विचार दूर होतात. वास्तूशास्त्रामध्ये पूजेदरम्यान घंटा वाजवणे हा एक सोपा उपाय सांगण्यात आलेला आहे.
घंटा वाजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूलाही महत्त्व असते. पितळ किंवा पितळापासून बनवलेल्या घंटा सर्वोत्तम मानल्या जातात. या धातूंपासून निर्माण होणारा आवाज वातावरणात सकारात्मकता पसरवण्यास मदत करते. तसेच मंदिरामध्ये देखील याच धातूपासून बनवलेल्या घंटा असतात. यामुळे फक्त वातावरणच शुद्ध होत नाही तर पूजेमधील प्रभाव देखील वाढ होता.
घंटा वाजवणे म्हणजे केवळ आवाज निर्माण करणे नसून देवांना आमंत्रित करणे देखील आहे. जेव्हा भक्त घंटा वाजवतात तेव्हा ते त्यांच्या आवडत्या देवतेला आवाहन करत असतात असे मानले जाते. असे करणे म्हणजे पूजा सुरू झाल्याचे आणि देवाला आमंत्रित करण्याचे संकेत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे देव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)