फोटो सौजन्य- pinterest
आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याची स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरावर असतो. घराच्या काही विशिष्ट दिशा मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेवर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. जर आपण वास्तूचे काही नियम पाळल्यास मुलांचे शिक्षण आणि आर्थिक स्थिती दोन्ही सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र या गोष्टी पाळण्यात आपण निष्काळजीपणा केल्यास त्याचे आपल्याला नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रामध्ये पश्चिम-नैऋत्य-पश्चिम दिशा अभ्यास आणि पैशांच्या बचतीसाठी खूप शुभ मानली जाते. मुलांना अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी वास्तूचे कोणते उपाय करावे, जाणून घ्या
पश्चिम-नैऋत्य-पश्चिम दिशा ही मुलांच्या अभ्यासाठी सकारात्मक ऊर्जा मानली जाते. यावेळी मुलांची खोली किंवा अभ्यास करायला बसण्याचे ठिकाण या दिशेला असल्यास मुलांमधील स्मरणशक्ती आणि एकाग्रता दोन्ही वाढण्यास मदत होते. या ठिकाणी ठेवलेले अभ्यासासंबंधित वस्तू दीर्घकाळ सकारात्मक परिणाम देतात.
ही दिशा केवळ अभ्यासाशीच संबंधित नसून कुटुंबाच्या बचत आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेशी देखील त्याचा संबंध आहे. यावेळी तुम्ही जर पैसे, दागिने किंवा महत्त्वाची कागदपत्रे या दिशेला ठेवल्यास ती दीर्घकाळ सुरक्षित राहतात आणि संपत्तीमध्ये हळूहळू वाढ देखील होण्यास सुरुवात होते. आर्थिक नुकसान होण्याची भीती देखील राहत नाही.
कोणतीही दिशा तेव्हाच फायदेशीर ठरते त्यावेळी वस्तू तिथे योग्य पद्धतीने ठेवली जाते. मुलांची पुस्तके, प्रती आणि इतर अभ्यास साहित्य नेहमीच नीटनेटके आणि व्यवस्थित असले पाहिजे. तसेच पैसे आणि कागदपत्रे देखील सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून त्यांचे फायदे दीर्घकाळ मिळू शकतील.
कधीकधी घरामध्ये केलेले छोटे बदल खूप फायदेशीर ठरु शकतात. जसे की, मुलांचे अभ्यासाचे टेबल पश्चिम-नैऋत्य-पश्चिम दिशेला ठेवावे. तसेच वह्या पुस्तके देखील योग्य दिशेला ठेवावीत. त्यामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढतो आणि अभ्यासामधील सातत्य वाढते. त्यासोबतच या दिशेला पैसे किंवा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्याने आर्थिक स्थिरता देखील राहते.
पश्चिम-नैऋत्य-पश्चिम दिशा मुलांची शिक्षण आणि शिकण्याची क्षमता मजबूत करते. मुलांची खोली किंवा अभ्यासाची जागा या योग्य दिशेला असल्या तर त्यांच्यामधील एकाग्रता वाढते आणि ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. बुकशेल्फ किंवा स्टडी टेबल मुलांची समज आणि स्मरणशक्ती सुधारतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)