फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असते, करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवायचे असते त्यासाठी खूप मेहनत करुनही अपेक्षित यश मिळत नाही. मात्र खूप मेहनत घेऊनही अपेक्षित नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी समस्या कायम असतील तर आपण स्वतःला अयशस्वी समजू लागतो. जर तुमच्या जीवनामध्ये वारंवार अडथळे येत असतील, प्रमोशन मिळत नसेल वारंवार मुलाखती देऊनही तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल तर तुमच्या कुंडलीमध्ये वास्तूदोष असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात किंवा ऑफिसमध्ये काही विशिष्ट दिशा, रंग, वस्तू आणि गोष्टी असतात ज्या कामाच्या ठिकाणी असलेली वास्तू बिघडवू शकतात. या गोष्टी वास्तुनुसार नसल्यास व्यक्तीला करिअरमध्ये यश मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
हल्ली बाहेरच्या जगामध्ये खूप स्पर्धा आहेत. तांत्रिक प्रगतीसह, व्यावसायिकांशी बरोबरी राखणे महत्त्वाचे आहे. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन कौशल्ये शिकणे आवश्यक आहे. ऑफिस वास्तू सारख्या अंतर्गत घटकांना बळकटी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
घरामधील पश्चिम दिशा करिअरच्या वाढीसाठी सर्वात शक्तिशाली ठिकाणांपैकी एक दिशा मानली जाते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सातत्यपूर्ण यश हवे असल्यास घराच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर करिअरसंबंधित ध्येयांचे, उद्दिष्टांचे आणि इच्छांचे चित्र लावा. यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयाची सतत आठवण होईल. आव्हाने किंवा अडथळ्यांच्या काळातही सकारात्मक मानसिकता राखण्यास हा उपाय खूप फायदेशीर ठरेल.
घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील भिंतीवर तुमच्या कामगिरीचे प्रतीक बनवा. जसे की, तुमचे ट्रॉफी, प्रमाणपत्रे, पुरस्कार किंवा आतापर्यंत मिळालेले कोणतेही सन्मान या दिशेला ठेवू शकता. ही दिशा यशाच्या उर्जेने भरलेली असते. यामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम राहतो. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व आणि पश्चिम दिशा ही प्रगती आणि ओळखीशी संबंधित आहेत.
तुमच्या स्वप्नांसाठी घराची किंवा कामाच्या जागेची दक्षिण भिंत सर्वोत्तम मानली जाते. या भिंतीवर उंच इमारती किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचे आहे, ज्या ठिकाणी कार्यालय उघडायचे आहेत त्या ठिकाणाचे फोटो लावा. यामुळे तुमची स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. तसेच उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)