फोटो सौजन्य- pinterest
पावसाळा हा निसर्गाच्या पुनरुज्जीवनाचा आणि वाढीचा काळ मानला जातो. या काळामध्ये अनेक आव्हाने आपल्या समोर येऊन उभी राहतात. पावसाळ्यात तुमच्या घरात भेगा, गळती, कीटक आणि दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. वास्तुशास्त्रामध्ये यांसारख्या काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जर तुमचे घर पावसाळ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते. वास्तुचे उपाय प्रत्येक दोष दूर करतात आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणतात. जाणून घ्या पावसाळ्यात कोणत्या नियमांचे पालन करावे.
पावसाळ्यात ईशान्य दिशेला तोंड असलेले सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात सुसंवाद, समृद्धी आणि शुभता येते.
वास्तुनुसार घरामधील पाण्याची टाकी नेहमी उत्तर दिशेला असावी तिला पाण्याचे तत्व असल्याचे मानले जाते. कारण याचा संबंध संपत्ती आणि समृद्धीशी असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची टाकी असणे शुभ मानले जाते.
पावसाळ्यात घर नेहमी उबदार आणि कोरडे ठेवा खास करुन ईशान्यकडील भाग. हे क्षेत्र मनाचे प्रतिनिधित्व करते म्हणून ते स्वच्छ, चांगले प्रकाशित आणि गोंधळमुक्त ठेवा. घरामध्ये असलेल्या सर्व भेगा आणि गळती दुरुस्त करुन घ्या. नैऋत्य किंवा आग्नेय दिशेला कोणतीही गळती असेल तर ती दुरुस्त करुन घ्या
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पायऱ्या देखील खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. पायऱ्या नेहमी घराच्या नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असाव्यात. पायऱ्याची दिशा नेहमी ईशान्य, उत्तर किंवा मध्य ब्रह्म स्थानात नसाव्यात. त्यासोबतच कपाट, देव्हारा, बाथरूम किंवा रद्दी पायऱ्यांखाली ठेवू नये, असे करणे अशुभ मानले जाते.
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वास्तुशी संबंधित काही झाडे आणि रोपे नक्कीच लावा. फर्न आणि पाम वृक्षांसारखी झाडे जी दमट परिस्थितीत वाढतील अशी चांगली झाडे निवडा किंवा ईशान्य दिशेला तुळस लावा. पावसाळ्यात घरात लेमनग्रास लावणे उत्तम असते कारण ते तुमच्या घरात त्याचा सुगंध पसरवू शकते.
घरातल्या छतावर साचलेले पाणी तुमच्या घरामध्ये आल्यास तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. बाल्कनी आणि टेरेसवरील भांड्यांमध्ये पाणी साचणार नाही याची खात्री करा. घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि डास आणि कीटक घरात प्रवेश करण्यापासून रोखले जातात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)