Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: पतीच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हे काही खास वास्तू टिप्स, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

पतीचे यश हे केवळ मेहनतीवर नाही तर घरातील सकारात्मक उर्जेवर देखील अवलंबून असते. जर तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी जाणून घ्या वास्तू टिप्स

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 06, 2025 | 11:30 AM
Vastu Tips: पतीच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हे काही खास वास्तू टिप्स, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

Vastu Tips: पतीच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हे काही खास वास्तू टिप्स, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंब आनंदी राहावे, जोडीदाराने नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करत राहावे, असे वाटत असते. मात्र कधीकधी खूप मेहनत घेऊन देखील अपेक्षित यश मिळत नाही. घरामधील वातावरण आणि घरात असलेल्या वस्तूंमुळे व्यक्तीच्या यशावर आणि आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवलेल्या वस्तू जीवनात सकारात्मक बदल आणू शकतात. जर तुम्हाला तुमच्या पतीचे करिअर पुढे जात राहावे, त्यात अपेक्षित यश मिळावे, आर्थिक स्थिती स्थिर राहावी असे वाटत असल्यास घरामध्ये वास्तूचे असे काही सोपे उपाय केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. जाणून घ्या पतीला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळविण्यासाठी वास्तूचे कोणते सोपे उपाय करायचे.

Anant Chaturdashi 2025: बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून का पाहू नये, जाणून घ्या यामागील कारणे

मनी प्लांट

तुम्ही घरामध्ये उत्तर दिशेला निळ्या रंगांच्या बाटलीमध्ये मनी प्लांट लावला तर ते तुमच्या पतीच्या करिअरमध्ये वाढ होण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मनी प्लांटला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. निळ्या बाटलीमध्ये हे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पतीचे करिअर प्रगतीपथावर जाते.

लक्ष्मी देवीचा फोटो लावणे

घरामधील आग्नेय दिशा ही देवी लक्ष्मीची संपत्तीची दिशा मानली जाते. यामुळे या दिशेला देवी लक्ष्मीचे चित्र लावल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच आर्थिक स्थिती देखील सुधारेल. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तसेच या ठिकाणी चित्र लावल्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि अचानक होणारे खर्च देखील दूर होतात.

या दिशेला होते पतीची कामगिरी

जर तुमच्या पतीकडे शैक्षणिक प्रमाणपत्रे, ऑफिस पुरस्कार, पदके किंवा ट्रॉफी इत्यादी गोष्टी असल्यास त्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवा. असे केल्याने पतीला व्यवसायामध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात. पदोन्नतीची शक्यता निर्माण होते. समाजामध्ये त्याचे नाव होते. कीर्ती देखील वाढू लागते. हे स्थान यशांना बळकटी देते आणि खूप मेहनत घेतल्याने त्याला लवकर अपेक्षित ते फळ मिळते.

कार्यालयाची वास्तू या दिशेला असावी

तुमच्या पतीच्या ऑफिसशी संबंधित वस्तू घरामध्ये असल्यास घराच्या पश्चिम दिशेला असावी जसे की, लॅपटॉप, ऑफिसच्या फाईल्स किंवा कोणतेही महत्त्वाचे कागदपत्रे इत्यादी गोष्टी घराच्या पश्चिम दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे व्यवसायात आणि करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे व्यक्तीच्या कामामध्ये कामात स्थिरता आणि यश आणतात.

Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणात या राशीच्या लोकांना बाळगावी लागणार नाही भीती, उत्पन्नात होईल वाढ

सकारात्मकतता टिकवून ठेवण्यासाठी करा हे उपाय

  • घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा त्यामुळे तुमचा उर्जेचा प्रवाह व्यवस्थित राहतो.
  • घरामध्ये तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू कोणत्याही दिशेला ठेवू नका, तुमच्या करिअरवर आणि घरातील सदस्यांवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • देव्हारा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि तिथे दररोज दिवा लावा.
  • पतीची खुर्ची किंवा कामाची खुर्ची नेहमी भिंतीला आधार द्यावी, यामुळे त्याला कामात स्थिरता आणि आत्मविश्वास मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips vastu tips for progress in husband success career positive energy will enter the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास वाढू शकतात अडचणी, काय सांगते वास्तुशास्त्र
1

Vastu Tips: फ्रिजवर या वस्तू ठेवल्यास वाढू शकतात अडचणी, काय सांगते वास्तुशास्त्र

Vastu Tips: घरात चिंचेचे रोप लावणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र
2

Vastu Tips: घरात चिंचेचे रोप लावणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

Astro Tips: घराच्या उंबरठ्यावर उभे असताना करू नका या चुका, जीवनात येऊ शकतात समस्या
3

Astro Tips: घराच्या उंबरठ्यावर उभे असताना करू नका या चुका, जीवनात येऊ शकतात समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.