(फोटो सौजन्य: Pinterest)
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रविवार, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. याचा कालावधी 3 तास 30 मिनिटे एवढा राहील. कुंभ राशीत फिरणाऱ्या चंद्राला रविवारी रात्री 9.57 वाजता ग्रहण लागेल. यावेळी शतभिषानंतर चंद्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रातून संक्रमण करेल. त्यावेळी राहू चंद्रासोबत राहील. सूर्य, बुध आणि केतूची देखील चंद्रावर दृष्टी राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे अनेक शुभ अशुभ घटना घडणार आहेत. त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळा परिणाम होताना दिसून येऊ शकतो. मेष आणि वृश्चिक राशींसह काही राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आणि फायदेशीर राहणार आहे. या काळात करिअरमध्ये अनेक संधी उपल्बध होतील. तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कोणत्या राशीच्या लोकांना भीती बाळगण्याची गरज नाही आहे, जाणून घ्या.
Zodiac Sign: रवी योगामुळे या राशींच्या लोकांना होईल अधिक फायदा, चमकेल तुमचे नशीब
मेष रास
7 आणि 8 सप्टेंबर रोजी मध्यरात्री होणारे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अधिक फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक गोष्टीत अधिक फायदा होईल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. या काळात तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रगती कराल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. यावेळी तुम्ही चंद्रग्रहण संपल्यानंतर कोणत्याही गोष्टींचे दान करणे खूप फायदेशीर राहील. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
कन्या रास
चंद्रग्रहणाच्या काळ कन्या राशीच्या लोकांना खूप शुभ राहणार आहे. या राशीच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रहण सहाव्या घरामध्ये होणार आहे. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील तसेच तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्ही कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. काही कामानिमित्त तुम्ही कर्ज घेणार असाल तर त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही कठीण परिस्थितून यशस्वीपणे बाहेर पडाल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शेवटचे चंद्रग्रहण खूप फायदेशीर राहणार आहे. तुमचे दीर्घकाळापासून अडकलेले काम वेळेवर पूर्ण होईल. तसेच तुम्हाला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. या काळात तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. यावेळी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय क्षेत्रात असणाऱ्या लोकांना पुढे जाण्यासाठी सुवर्णसंधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. यावेळी जीवनात आनंद आणि समृद्धी राहील. वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात मंत्रांचा जप करणे खूप फायदेशीर राहील.
Anant Chaturdashi 2025: बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून का पाहू नये, जाणून घ्या यामागील कारणे
धनु रास
चंद्रग्रहणाचा काळ धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत अपेक्षित यश मिळेल. तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिकांना लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित संधी मिळतील. या काळात करिअरमध्ये अपेक्षित वाढ होईल. तुम्हाला पुढे जाण्यासाठी योग्य संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सदस्यांचे सहकार्य मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)