(फोटो सौजन्य: Pinterest)
अनंत चतुर्दशीच्या दिवशी 10 दिवस चांगला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी मन आनंदने आणि दुःखाने भरून येते. या भावनेने बाप्पाचे विसर्जन करून पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करतो. मात्र विसर्जनानंतर मागे वळून का पाहिले जात नाही तुम्हाला माहिती आहे का?
यंदा अनंत चतुर्दशी आज शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी सर्व गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. ज्याप्रमाणे घरात किंवा सार्वजनिक मंडळामध्ये ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन होते त्याचप्रमाणे बाप्पाचे विसर्जन देखील होणार आहे. काही लोक दीड, पाच, गौरी गणपतीबरोबर विसर्जन करतात. मात्र सर्वात जास्त विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते. विसर्जनानंतर मागे वळून पाहिले जात नाही. विसर्जनानंतर मागे वळून का पाहिले जात नाही, जाणून घ्या त्यामागील कारण.
Numerology: या मूलांकांच्या लोकांची व्यवसायात होईल प्रगती, मिळेल अपेक्षित यश
प्रत्येक गोष्टीतील अडथळे दूर होणे
हिंदू धर्मामध्ये गणेशाची पूजा प्रथम केली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की गणपती बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्याला सुख शांती आणि समृद्धी प्राप्ती होते. त्यासोबतच पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील बुध ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि कुंडलीतील कोणत्याही दोष असल्यास ते दूर होतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला वाजत गाजत घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळात आणले जाते. त्याची दहा दिवस विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे वाजत गाजत विसर्जनही केली जाते. विसर्जनाच्या दिवशी सर्व भक्त बाप्पाची आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागून आशीर्वाद घेतात आणि पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी कामना करतात.
विसर्जनानंतर मागे वळून का पाहत नाहीत
धार्मिक मान्यतेनुसार, बाप्पाच्या विसर्जनानंतर मागे वळून पाहू नये. याचा अर्थ असा आहे की, आपण आपल्या जीवनात पुढे जात राहिले पाहिजे आणि पूजनीय असणाऱ्या विघ्नहर्तावर विश्वास ठेवला पाहिजे की तो नेहमीच आपल्यासोबत आहे. अशाप्रकारे, तुम्ही केवळ गणपती बाप्पाचा आदरच नाही तर देवाच्या भक्तीचा आणि आशीर्वादाचा पूर्ण आनंद घ्याल. आपण मागे होऊन पाण्याचा अर्थ असा मानला जातो की आपण बाप्पापासून वेगळे होण्याचे दुःख आपल्या हृदयात दाबून धरले आहे. धर्म ग्रंथात म्हटल्यानुसार उपासना आणि उपवासाचे फळ तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण आपली आसक्ती बाजूला ठेवून पुढील वर्षाचे स्वागत श्रद्धेने आणि आशेने करण्याची प्रतिज्ञा करतो.
Zodiac Sign: रवी योगामुळे या राशींच्या लोकांना होईल अधिक फायदा, चमकेल तुमचे नशीब
अविश्वासाचे प्रतीक
बाप्पांचे विसर्जन म्हणजे बाप्पा आता पाण्यात विलीन होईल आणि पुन्हा आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीच्या रूपात येईल. विसर्जनानंतर मागे वळून पाहणे हे अविश्वासाचे प्रतीक मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने विसर्जनानंतर वारंवार मागे वळून पाहिले तर त्याची ध्यान करण्याची शक्ती कमकुवत होते, अशी मान्यता आहे. यामुळे म्हटले आहे की पुढे जा आणि तुमच्या आयुष्यात नवीन सकारात्मक उर्जेचे स्वागत करा असे म्हटले जाते. विसर्जन म्हणजे केवळ मूर्ती पाण्यात टाकणे नव्हे तर अहंकार, पापे आणि दुःखांचे विसर्जन करणे देखील आहे. मागे वळून पाहणे म्हणजे पुन्हा जुन्या दुःखात अडकणे, म्हणून विसर्जनानंतर मागे वळून पाहणे निषिद्ध आहे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)