फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार झाडूंबाबत अनेक नियम सांगिण्यात आलेले आहे. झाडू वापरण्यापासून ते साठवण्यापर्यंत, असे अनेक नियम आहेत ज्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकांच्या जीवनात अडथळे येऊ शकतात, अनेक कामे उद्ध्वस्त होऊ शकतात आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापासून त्यांना वंचित देखील राहावे लागू शकते. जाणून घ्या झाडू खरेदी करण्याचे हे नियम
दरम्यान, वास्तुशास्त्रात घरे आणि त्यांच्याशी संबंधित सर्व गोष्टींबद्दल असंख्य नियम सांगण्यात आले आहे. मान्यतेनुसार एखादी गोष्ट योग्य दिशेने न ठेवल्यास त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. घरातील प्रत्येक खोलीची आणि त्यातील प्रत्येक गोष्टीची ऊर्जा आपल्याशी जोडलेली आहे. मात्र काही लोक या गोष्टीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या नियमांचे पालन केल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता येऊ शकते.
जर तुम्हाला तुमचा जुना काढून नवीन झाडू नवीन घ्यायचा असल्यास तर शनिवार हा यासाठी सर्वोत्तम दिवस असेल. शनिवारी नवीन झाडू वापरल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. महिन्याच्या अंधाराच्या पंधरवड्यात झाडू खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते.
घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो. झाडू लावण्याबाबत आणि वापरण्याबाबत अनेक वास्तूचे नियम सांगण्यात येत आहे. त्याच्या खरेदीबाबत काही नियम आहेत, जर लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांना आयुष्यभर गरिबीचा सामना करावा लागू शकतो. शुक्ल पक्षात झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या काळात झाडू खरेदी केल्याने घरामध्ये दुर्दैव येते, असे म्हटले जाते. तर कृष्ण पक्षामध्ये झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. चुकूनही शुक्ल पक्षात झाडू खरेदी करणे टाळावे. आणि शनिवारी खरेदी केलेल्या झाडूंमध्ये वेगवेगळ्या ऊर्जा असतात.
ज्यावेळी झाडू जीर्ण होऊ लागतो त्यावेळी लोक वेळ किंवा दिवस काहीही असो, तो लगेच बदलतात. म्हणून, वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करण्यापासून ते टाकून देण्यापर्यंत अनेक नियम सांगितले आहेत. जर तुमच्या घरातील झाडू पूर्णपणे जीर्ण किंवा तुटलेला असेल तर तो वापरणे टाळा. झाडूला धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. म्हणून, झाडूचा अनादर करणे टाळावे. तसेच झाडू नेहमी योग्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे. ते ठेवण्यासाठी नेहमीच योग्य जागा निवडा आणि कधीही झाडू उभा ठेवू नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)