Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरामध्ये क्रॅसुला रोप या दिशेला लावल्यास दारिद्र्य होईल दूर

क्रॅसुला वनस्पतीला नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये हे रोप योग्य दिशेने लावण्यासाठी विशेष महत्तव आहे. घरामध्ये क्रॅसुला वनस्पती कोणत्या दिशेला लावावी, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 03, 2025 | 01:56 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

वास्तुशास्त्रामध्ये क्रॅसुला वनस्पतीला विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, हे रोप घरात लावणे म्हणजे कुबेराचे आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. क्रॅसुला वनस्पती नशीब, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये मनी ट्री असे देखील म्हटले जाते. जर वनस्पती चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचे अशुभ परिणाम मिळतात. क्रॅसुला वनस्पती लावण्यासाठी योग्य दिशा कोणती, जाणून घ्या

क्रॅसुला वनस्पती या दिशेला लावण्याचे फायदे

क्रॅसुला वनस्पती घरामध्ये योग्य दिशेला लावल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही तर कायम सकारात्मक ऊर्जा राहते. मान्यतेनुसार हे रोप घरी लावल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. तसेच आर्थिक संकटे देखील संपतात. घरामध्ये क्रॅसुला वनस्पती लावल्यास गरिबी दूर होण्यास मदत होते. असे मानले जाते की, परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहून नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतात. तसेच वास्तूदोषापासून देखील सुटका होते.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीच्या दिवशी ग्रहांचे अद्भुत संयोग, या राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य

या दिशेला लावा वनस्पती

जीवनामध्ये पैशाची कमतरता भासत असल्यास क्रॅसुला वनस्पती लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ही वनस्पती घरामध्ये नेहमी उत्तर दिशेला लावावी. याशिवाय तुम्ही ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता. ही वनस्पती ठेवण्यासाठी दोन्ही दिशा सर्वोत्तम मानल्या जातात. तसेच व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि करिअरमध्ये देखील प्रगती होते.

या पद्धतीने ठेवू नका वनस्पती

घरामध्ये वनस्पती लावणे खूप शुभ मानले जाते. मात्र, ही वनस्पती सुकलेली किंवा त्याची पाने सुकलेली असतील अशा पद्धतीची असल्यास परिवारामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. त्याचसोबत वनस्पतीची वाढ होत नसल्यास देखील ती घरामध्ये ठेवू नये.

Masik Durgashtami: मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवील या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

क्रॅसुला वनस्पती ठेवण्याचे काय आहेत नियम

मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला ही वनस्पती ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना याचा फायदा होतो.

क्रॅसुला वनस्पती घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी जिथे सूर्यप्रकाश येत असेल. तसेच वनस्पतीची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रात म्हटल्यानुसार, क्रॅसुला वनस्पती ड्रॉईंग रुम किंवा बाल्कनीत ठेवल्यास आजूबाजूनचे वातावरण देखील प्रसन्न राहते.

मात्र ही वनस्पती घरामध्ये स्वयंपाकघर आणि शौचालयाजवळ चुकूनही क्रॅसुला वनस्पती ठेवू नये.

या वनस्पतीला आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यावे. त्याची योग्य ती काळजी घ्यावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips which direction should you place a crassula plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra Tips
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी
1

Vastu Tips Jade Plant: जेड प्लांट पिवळा पडला असेल तर दुर्लक्ष करू नका; ‘या’ उपायांनी रोपाची घ्या काळजी

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा
2

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.