Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद

वटपौर्णिमेचा सण हा नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी फार विशेष मानला जातो. पहिली वटपौर्णिमा ही सर्वांसाठी खूप खास मानली जाते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात. हे व्रत आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून प्रत्येक स्त्री आयुष्यभर करते. नवविवाहित महिलांनी पहिली वटपौर्णिमा कशी साजरी करावी ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 29, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा
  • पहिल्या वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
  • नवविवाहित महिलांनी पाळावयाचे नियम
 

 

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्री व्रत करतात. नवविवाहित महिलांसाठी पहिली वटपौर्णिमा विशेष उत्साह, श्रद्धा आणि आनंदाने साजरी केली जाते. या दिवशी पारंपरिक पद्धतीने पूजा केल्यास अखंड सौभाग्य, कुटुंबातील सुख-समृद्धी आणि वैवाहिक जीवनात आनंद लाभतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

सौभाग्यासाठी प्रत्येक विवाहित महिला वटसावित्रीचे म्हणजेच वटपौर्णिमेचे व्रत करतात. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी तपश्चर्या करून यमाकडून आपल्या पतीला पुन्हा मिळवले होते. त्यामुळे यादिवशी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. त्यामुळे प्रथम वटपौर्णिमेच्या व्रतासाठी प्रत्येक महिला खूप उत्सुक असते. यंदाची वटपौर्णिमा आज सोमवार, 29 जून रोजी आहे. मात्र काहीजणींना व्रत कसे करावे, तसेच वटसावित्रीची पूजा कशी करायची याबद्दल योग्य माहिती नसते. त्यामुळे खास नववधू आणि प्रथम वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या विवाहित महिलांनी वटपौर्णिमा कशी साजरी करायची ते जाणून घेऊया

वटपौर्णिमेच्या दिवशी नववधूंनी अशी करावी साजरी

देवतांचे आशीर्वाद

नवविवाहित महिला लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने फारच उत्सुक असतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. आपल्या अखंड सौभाग्यासाठी देवतांचे आशीर्वाद घ्यावेत.

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

सोळा शृंगार करणे

प्रत्येक महिलेला नटायला आवडते. त्यामुळे वडाच्या पूजेसाठी तयार होताना सर्वप्रथम साज शृंगार करावा. हा दिवस तर विशेष असल्याने यादिवशी महिला आपल्या पतीसाठी सोळा शृंगार करतात. त्यामुळे छान दागदागिने घालावेत. पारंपरिक दागिने असतील तर ते नक्की घाला यामुळे तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल.

नऊवारी साडी नेसणे

नवविवाहित महिलांसाठी शृंगारातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे साडी. काहीजण यादिवशी पारंपरिक नऊवारी साडी नेसतात. तर अनेकजणी भरजरी साडी नेसतात. काहींच्या घरची रीत असते यादिवशी लग्नातील शालू किंवा सप्तपदीची साडी नेसण्याची. यामागचे कारण म्हणजे लग्नातील पवित्र विधी तुम्ही त्या साडीवर केलेले असतात त्यामुळे त्या वस्त्राला देखील पावित्र्य आणि सौभाग्य लाभलेले असते म्हणून जमल्यास लग्नातील शालू किंवा साडी नेसावी.

हिरव्या बांगड्याचे महत्त्व

सोळा शृंगार करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हातातील बांगड्या. आपल्याकडे हिरव्या बांगड्याना विशेष महत्व असते. लग्नात देखील हिरवा चुडा भरला जातो. त्याप्रमाणेच यादिवशी देखील नवविवाहित महिला हिरव्या बांगड्या घालतात. भांगेत कुंकू भरून कपाळी टिकली लावून शृंगार करून त्या अगदी नववधूसारख्या दिसूनच आपली प्रथम वटपौर्णिमा साजरी करतात.

Strawberry Moon: स्ट्रॉबेरी मून म्हणजे काय? वटपौर्णिमेच्या दिवशी आकाशात दिसणार दुर्मिळ खगोलीय दृश्य

वटपौर्णिमेचा उपवास

व्रत करताना काहीजणी दिवसभर व्रत करतात तर काहीजणी वटपूजा झाल्यानंतर व्रत सोडतात. मात्र हा उपवास दिवसभर करून तो दुसऱ्या दिवशी सोडण्याची काहींच्या घरची पद्धत असते. तुम्ही तुमच्या कौटुंबिक रीतीप्रमाणे व्रत करू शकता. तसेच वडपूजा करताना पूजेचे सामान घेऊन वडाच्या झाडाशी जावे. झाडाला नमस्कार करून हार फुले हळदीकुंकू वहावे. पाचफळे ठेवावीत. साजशृंगाराचे सामान पूजेत असते ते देवी सावित्रीला वडाच्या झाडाशी अर्पण करावे. पांढरा धागा वडाला सात प्रदक्षिणा घालून बांधावा. यामुळे आपले सौभाग्य वाढते असे मानतात.

वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

धार्मिक श्रद्धेनुसार वटपौर्णिमेचा उपवास हा सावित्री माता आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या कथेशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की पतीवरील अढळ प्रेम, तपश्चर्या आणि दृढनिश्चयाच्या जोरावर सावित्री मातेने यमराजाकडून आपल्या पतीचा जीव परत मिळवला. तेव्हापासून, हा उपवास अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात वटवृक्षालाही पवित्र मानले जाते. त्याचे दीर्घायुष्य आणि विशाल आकार हे स्थिरता, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवविवाहित महिलांसाठी पहिली वटपौर्णिमा का विशेष असते?

    Ans: लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा नववधूच्या वैवाहिक जीवनातील महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्य, सुखी संसार आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत केले जाते

  • Que: नवविवाहित महिलांनी वटपौर्णिमेला कोणते नियम पाळावेत?

    Ans: पूजा श्रद्धा आणि भक्तिभावाने करावी, घरातील परंपरेचे पालन करावे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि शक्य असल्यास दानधर्म करावा.

  • Que: पहिल्या वटपौर्णिमेचे व्रत केल्याने काय फल मिळते?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीचे दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य, वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी आणि कुटुंबाचे मंगल होण्याची श्रद्धा आहे.

Web Title: Vat purnima 2026 how should newlyweds celebrate their first vat poornima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Numberlogy: वटपौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायामध्ये मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: वटपौर्णिमेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायामध्ये मिळेल अपेक्षित यश

Weekly Horoscope: जून महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील ते जाणून घ्या
2

Weekly Horoscope: जून महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Vat Purnima 2026: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचे…! वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यामध्ये वाढेल गोडवा
3

Vat Purnima 2026: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचे…! वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यामध्ये वाढेल गोडवा

Shabari Story: शबरीने श्रीरामांना उष्टी बोरे का खाऊ घातली? जाणून घ्या पौराणिक कथा
4

Shabari Story: शबरीने श्रीरामांना उष्टी बोरे का खाऊ घातली? जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.