Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi 2025: विनायक चतुर्थीच्या रात्री करा ‘हे’ उपाय, तुम्हाला मिळेल अपेक्षित यश

मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला येणाऱ्या तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात. या दिवशी काही उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे मानले जाते. विनायक चतुर्थीला कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2025 | 10:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • विनायक चतुर्थी कधी आहे
  • विनायक चतुर्थी उपाय
  • उपाय केल्याने होतो फायदा
 

हिंदू धर्मात गणपती बाप्पाला पूजनीय देवता मानली जाते. त्यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे आणि त्यांना “विघ्नहर्ता या नावाने देखील ओळखले जाते. ज्याचा अर्थ सर्व अडथळे दूर करणारा आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते. पंचागानुसार मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत सोमवार, 24 नोव्हेंबर रोजी पाळले जाणार आहे.

असे मानले जाते की या दिवशी योग्य विधींनी गणपती बाप्पाची पूजा केल्याने आणि विशेषतः रात्री काही चमत्कारिक उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते. विनायक चतुर्थीच्या रात्री कोणते उपाय केल्याने तुम्हाला फायदा होणार आहे ते जाणून घ्या

विनायक चतुर्थीचे उपाय

आर्थिक संकट

जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांना तोंड देत असाल किंवा तुमचा पैशाचा प्रवाह बंद झाला असेल तर हा उपाय करणे खूप प्रभावी आहे. हा उपाय करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा झाल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मातीच्या दिव्यात शुद्ध गायीचे तूप टाका. या दिव्यामध्ये चार लवंग टाकून तो पेटवा. दिवा लावताना गणपती बाप्पाजवळ दुर्वा अर्पण करा आणि ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा. श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने गरिबीचा नाश करतो आणि संपत्ती मिळविण्याचे नवीन मार्ग उघडतो.

Shubh Mahasanyog: 25 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, ग्रहांच्या संयोगामुळे मिळणार प्रचंड संपत्ती आणि प्रतिष्ठा

नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय

नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. विनायक चतुर्थीच्या रात्री घराच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ दोन तोंडी दिवा लावा. असे केल्याने घरामध्ये आनंद आणि शांती येते. तसेच सकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊन नकारात्मक ऊर्जा दूर होते.

राहू-शनि दोष आणि कर्जापासून सुटका

जर तुम्ही राहू आणि शनि दोषामुळे त्रस्त असाल किंवा कर्जामुळे तुमचे जीवन सतत अडचणीत येत असल्यास हे उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल. विनायत चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पिठाचा दिवा बनवा, त्यात मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल घ्या आणि पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा लावा. हा उपाय केल्याने राहू आणि शनिच्या दुष्परिणामांपासून आराम मिळतो. कर्जाशी संबंधित समस्याही दूर होतात आणि उत्पन्न वाढते.

Vivah Panchami 2025: विवाह पंचमीला करा हे काम, तुमच्यावर राहील रामसीतेचा आशीर्वाद

प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश

पूजा करताना गणपती बाप्पाला शमीचे पान अर्पण करा. शमीच्या झाडाची पूजा केल्यानंतर हे पान अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. रात्री गणपती बाप्पासमोर बसून अथर्वशीर्षाचे पठण करावे त्यामुळे बुद्धिमत्ता, ज्ञान वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यानंतर बाप्पाला मोदक आणि लाडूचा नैवेद्य दाखवा. जीवनातील वारंवार येणाऱ्या त्रासांपासून सुटका मिळविण्यासाठी संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: विनायक चतुर्थी कधी आहे

    Ans: विनायक चतुर्थी 24 नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: विनायक चतुर्थीला उपाय केल्याने काय फायदा होतो

    Ans: विनायक चतुर्थीला उपाय केल्याने आर्थिक प्रगती, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, करिअर, अडचणी इत्यादी फायदा होतो

  • Que: कोणत्या महिन्यातील विनायक चतुर्थीची पूजा शुभ मानली जाते

    Ans: विनायक चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते. फाल्गुन, आषाढ, भाद्रपद आणि माघ महिन्यातील चतुर्थी शुभ मानली जाते

Web Title: Vinayak chaturthi 2025 do these remedies on the night of vinayak chaturthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
1

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Narada Purana: भगवान विष्णू भक्तीचे महत्त्व सांगणारे नारद पुराण काय सांगते? जाणून घ्या
2

Narada Purana: भगवान विष्णू भक्तीचे महत्त्व सांगणारे नारद पुराण काय सांगते? जाणून घ्या

Bhanu Saptami 2026: जून महिन्यात कधी आहे भानू सप्तमी, जाणून घ्या तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व
3

Bhanu Saptami 2026: जून महिन्यात कधी आहे भानू सप्तमी, जाणून घ्या तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व

Ahilyabai Holkar Jayanti: काशी विश्वनाथसह अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारामागील लोकमाता अहिल्याबाईंचे योगदान
4

Ahilyabai Holkar Jayanti: काशी विश्वनाथसह अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारामागील लोकमाता अहिल्याबाईंचे योगदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.