Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: बुधवार आणि विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर करा ‘हे’ उपाय, विघ्नहर्ता करेल तुमची सर्व अडचणी दूर

बुधवार, 20 मे रोजी विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी गणपतीची पूजा करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. याशिवाय, विनायक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करणे शुभ मानले जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 20, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय
  • विनायक चतुर्थीचे व्रत पाळण्याचे फायदे
  • उपाय केल्याने अडचणी होतील दूर
 

वरद विनायक चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला पाळले जाते. या दिवशी गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्या संस्कृतीतमध्ये गणपतीला पूजनीय प्रथम देवता मानले जाते. इतर कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की गणपतीला चतुर्थीची अधिष्ठात्री देवता मानले जाते. त्यांची पूजा बुद्धी, समृद्धी आणि सुदैवाची देवता म्हणूनही केली जाते. गणपतीची पूजा केल्याने त्वरित फळ मिळते असे मानले जाते आणि या दिवशी उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, ज्ञानप्राप्ती होते आणि संपत्तीतही वाढ होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

विनायक चतुर्थी उपाय

विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी उपाय

जर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये यश मिळवून चांगली नोकरी मिळवायची असेल किंवा आपल्या मुलाने/मुलीने कॉलेज प्लेसमेंटमध्ये यश मिळवावे अशी पालकांना आशा असेल तर त्यांनी विनायक चतुर्थीच्या दिवशी गं गणपत्ये नमः। या मंत्रांचा विद्यार्थ्यांनी 108 वेळा जप करावा.

प्रसिद्धी हवी असस्यास उपाय

जर तुम्हाला तुमच्या जीवनात प्रेम आणि प्रसिद्धी हवी असेल, तर विनायक चतुर्थीच्या दिवशी पाच वेलची आणि पाच लवंगा गणपतीला अर्पण करा. तसेच हात जोडून प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद घ्या.

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत

व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी

जर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबतचे संबंध सुधारायचे असतील, तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदाराला गणपतीची एक छोटी मातीची मूर्ती भेट द्यावी.

संकटनाशन गणेश स्तोत्र

जर कोणी तुम्हाला वारंवार त्रास देत असेल किंवा तुम्हाला नको असलेले काम करण्यास भाग पाडत असेल, तर असे त्रास टाळण्यासाठी तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पासमोर हात जोडून संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणावे.

क्रीडा आणि राजकारणात यश मिळविण्यासाठी उपाय

जर तुम्हाला क्रीडा किंवा राजकारणात यश मिळवून आपले स्थान प्रस्थापित करायचे असेल, तर विनायक चतुर्थीच्या दिवशी ओम ह्रीं ग्रीं ह्रीं या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. गणपतीच्या मंत्रांचा जप करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जपमाळ तुळशीची नसावी. गणपतीच्या पूजेमध्ये तुळस किंवा तुळशीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूचा वापर केला जात नाही. तुळशीऐवजी तुम्ही लाल चंदन, स्फटिक किंवा रुद्राक्षाची जपमाळ वापरू शकता.

आर्थिक लाभासाठी उपाय

जर तुम्हाला जीवनात आर्थिक लाभ आणि कीर्ती मिळवायची असेल, तर विनायक चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाच्या आशीर्वादाने परिपूर्ण असलेल्या अष्टमुखी रुद्राक्षाची विहित विधीनुसार पूजा करून तो धारण करावा.

Numberlogy:  विनायक चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा

या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा. तुम्हाला सुख प्राप्त होईल.

विनायक चतुर्थीचे व्रत पाळण्याचे फायदे

वरद विनायक चतुर्थीच्या दिवशी उपासना आणि उपवास केल्याने अडथळे दूर होतात आणि बुद्धी तीक्ष्ण होते. अधिक मासात हे व्रत पाळल्याने गणेशाची विशेष आशीर्वाद प्राप्त होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: विनायक चतुर्थीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: विनायक चतुर्थी हा भगवान गणेशांना समर्पित दिवस असून या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विघ्ने दूर होतात अशी श्रद्धा आहे.

  • Que: विघ्नहर्ता गणेश अडचणी दूर करतो अशी श्रद्धा का आहे?

    Ans: भगवान गणेशांना विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारे देव मानले जाते. त्यामुळे शुभ कार्यांपूर्वी त्यांची पूजा केली जाते.

  • Que: या दिवशी कोणते उपाय करावेत?

    Ans: गणपतीला दुर्वा, मोदक आणि लाल फुले अर्पण करून “ॐ गं गणपतये नमः” मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

Web Title: Vinayak chaturthi upay by doing this remedy your problems will be solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.