फोटो सौजन्य- istock
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पााला समर्पित आहे. यावेळी गणपती बाप्पाची मुहूर्तावर विधिपूर्वक पूजा केली जाते. काही जण उपवास देखील करतात. संकष्टी आणि विनायक चतुर्थीला गणेशाची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी हे व्रत पाळले जाते.
संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि जीवनामध्ये असलेले अडथळे दूर होतात. कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे आणि मुहूर्त जाणून घ्या
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २५ ऑक्टोबर रोजी पहाटे १:१९ वाजता सुरू होईल. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:४८ वाजता संपेल. चतुर्थी तिथीच्या वेळी चंद्रदर्शन केले जाते. यंदा विनायक चतुर्थी शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी आहे.
विनायक चतुर्थीच्या दिवशी सूर्योद्य सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी होणार आहे तर सूर्यास्त संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिटांनी होईल. चंद्रोदय – सकाळी ९:५० वाजता होईल आणि चंद्रास्त – संध्याकाळी ७:५८ वाजता होईल. यावेळी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4:46 ते 5:37 पर्यंत असेल. तर विजया मुहूर्त दुपारी 1:57 ते दुपारी 2:42 पर्यंत राहील. गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 5:42 ते संध्याकाळी 6:07 पर्यंत राहील. निशिता मुहूर्त – दुपारी 11:40 PM ते सकाळी 12:31 पर्यंत असेल.
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला अनेक शुभ योग तयार होत आहे. या योगामध्ये शिव कुटुंबाची पूजा केली जाईल. हा शुभ योग शोभन आणि रवि योग तयार होणार आहे. रात्रभर भद्रावास योग राहील. या योगात गणपतीची पूजा केल्याने भक्ताला आनंद आणि सौभाग्य वाढते.
या दिवशी भाविक सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर बाप्पाची पूजा करावी आणि नंतर उपवास करतात. याला मासिक विनायक चतुर्थी असेही म्हणतात. घर गंगाजलाने शुद्ध केले जाते आणि स्वच्छ कपडे परिधान करतात. जर मंदिरात जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास घरीच पूजा करावी. एक वस्त्र पसरवून घ्यावे आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची किंवा चित्राची स्थापना करावी. फुले, पंचामृत आणि नैवेद्य (खीर, फळे आणि काजू) या गोष्टीअर्पण कराव्यात. त्यानंतर गणेश मंत्राचा जप करा आणि शेवटी आरती करा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)