2025 मधील लग्नाचे मुहूर्त कोणते, आजच घ्या जाणून
सनातन धर्मात बहुतेक कामे शुभ मुहूर्त पाहूनच करण्याचा नियम आहे. हिंदू धर्मात शुभ मुहूर्तावर केलेल्या कामात यशाची शक्यता जास्त असते असे म्हणतात आणि ज्योतिषशास्त्रात अशी मान्यता आहे. अशीच एक शुभ घटना म्हणजे लग्न, ज्यामध्ये तारीख ठरवण्यापूर्वी नेहमी शुभ मुहूर्ताचा विचार केला जातो. काही कारणास्तव शुभ मुहूर्त उपलब्ध नसल्यास वधू आणि वर एकत्र लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात येते.
नव्या वर्षात ज्या जोडप्यांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी हा लेख अधिक महत्त्वाचा आहे. नव्या वर्षातील नक्की कोणते मुहूर्त आहेत आणि जोडप्यांसाठी कोणते खास दिवस असतील याबाबत ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
31 डिसेंबरपासून खरमास
2024 वर्षातील शुभ मुहूर्त डिसेंबर महिन्याच्या शेवटी संपतील. यानंतर महिनाभर विवाह आणि शुभ कार्ये प्रतिबंधित आहेत. अशा परिस्थितीत आता लग्नासाठी शुभ मुहूर्त 14 जानेवारीला मकर संक्रांतीनंतरच उपलब्ध होणार आहे. आज आम्ही तुम्हाला 2025 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्तांची यादी सांगणार आहोत. हे पाहून तुम्ही तुमच्या लग्नाची योग्य तारीखही ठरवू शकता.
पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तारखेपासून खरमास सुरू होतो असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येते. वैदिक कालगणनेनुसार, पौष महिना हा 31 डिसेंबर रोजी पौष महिना सुरू होत आहे आणि 29 जानेवारी, 2025 पर्यंत हा महिना चालेल.
Datta Jayanti 2024 Wishes: ‘मला हे दत्तगुरु दिसले’, प्रिजयनांना द्या दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवस करा पवित्र!
जानेवारी 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, जानेवारी 2025 मध्ये तुम्हाला लग्नासाठी 10 शुभ मुहूर्त मिळणार आहेत. तुम्ही 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26 आणि 27 जानेवारी यापैकी कोणत्याही तारखेला तुमचा विवाह प्लॅन करू शकता. या सर्व तारखा शुभ आहेत.
फेब्रुवारी 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
तुम्हाला फेब्रुवारी 2025 मध्ये लग्नासाठी 14 शुभ मुहूर्त मिळणार आहेत. यामध्ये 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23 आणि 25 या तिथी शुभ मानल्या जातात.
मार्च 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
मार्च 2025 मध्ये तुम्हाला लग्नासाठी फक्त पाच शुभ मुहूर्त मिळतील. या महिन्यात 1, 2, 6, 7 आणि 12 मार्च या तारखा विवाहासाठी शुभ मानल्या जातात.
एप्रिल 2025 लग्नाची लग्नाचे शुभ मुहूर्त
एप्रिल 2025 मध्ये तुम्हाला लग्नासाठी नऊ शुभ मुहूर्त मिळतील, त्यामुळे तुमच्याकडे अधिक पर्याय असतील. या महिन्यात 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29 आणि 30 एप्रिलला लग्नाचे नियोजन करता येईल.
मे 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
मे 2025 बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला त्या महिन्यात 15 शुभ मुहूर्त मिळणार आहेत. त्या महिन्यात 1, 5, 6, 8, 10, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24, 27 आणि 28 या तारखा विवाहासाठी शुभ मानल्या जातात.
जून 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
जून 2025 मध्ये लग्नासाठी फक्त 5 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. या महिन्यात केवळ 2, 4, 5, 7 आणि 8 मे या तारखा शुभ मानल्या जातात.
Margashirsha Guruvar 2024: महालक्ष्मीच्या पूजेत ठेवलेल्या नारळाला तडा गेला तर…
नोव्हेंबर 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
देव उदयानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये लग्नासाठी 14 शुभ तारखा उपलब्ध होतील. 2, 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 आणि 30 नोव्हेंबर हे लग्नासाठी शुभ मानले जातात.
डिसेंबर 2025 लग्नाचे शुभ मुहूर्त
पुढील वर्षी डिसेंबरमध्ये लग्नासाठी किमान 3 तारखा उपलब्ध असतील. त्या महिन्याच्या 4, 5 आणि 6 डिसेंबरला विवाह होऊ शकतात