फोटो सौजन्य- सोशल मीडिया
मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आज 12 डिसेंबर रोजी आहे.यावेळी महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार नारळात त्रिदेवांचाही वास असतो. कलशावर नारळ ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कार्ये विना अडथळा पूर्ण होतात. जेव्हा घरामध्ये कोणतीही पूजा होते तेव्हा सर्वात प्रथम कलशाची स्थापना होते. पण कलश कधीही खाली ठेवला जात नाही. कलशाच्या तळाशी गहू किंवा तांदळाचे धान्य ठेवले जाते आणि कलशाच्या आत एक नाणे ठेवले जाते. कलशाच्या वर एक नारळ नक्कीच ठेवला जातो आणि नारळाभोवती आंब्याची पाने ठेवली जातात.
धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना, पूजा करताना श्रीफळ वापरले जाते. तोही बिनापाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्रात सांगितले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो, तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात.
ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शास्त्रानुसार नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे फळ आहे. असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर प्रकट झाले तेव्हा त्यांनी देवी लक्ष्मी, कामधेनू गाय आणि नारळाचे झाड सोबत आणले होते. यामुळेच नारळ देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते आणि प्रत्येक पूजेमध्ये या फळाचा वापर केला जातो.
नारळाच्या आत ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास करतात अशीही एक मान्यता आहे. अशा स्थितीत जेव्हा घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाते तेव्हा प्रथम स्थान नारळाला दिले जाते.
असे मानले जाते की, भगवान शिवालाही नारळ आवडते. नारळावर दिसणारे तीन ठिपके भगवान शंकराचे तीन डोळे दर्शवतात.
ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बृहस्पतिचा कारक नारळ आहे अशीही एक मान्यता आहे. अशा स्थितीत कलशावर ठेवल्यावर गुरु बृहस्पती सुद्धा खूप प्रसन्न होतात आणि त्यांची नजर आपल्यावर असते. त्यांच्यासोबत आनंदी राहिल्याने घरात समृद्धी तर येतेच पण गुरूंचा आशीर्वाद जीवनात कायम राहतो.
बऱ्याचदा थंडीच्या दिवसात नारळाला तडा जाण्याचा प्रकार घडताना दिसतात. कारण बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळातील आतील तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे तापमान तयार झाल्यामुळे नारळाला तडा जाण्याची शक्यता निर्माण होते.
थंडीच्या दिवासत किराना दुकानात गेलात तर नारळ ओले करुन गोणपाटात झाकून ठेवलेले दिसतील. ज्या दुकानात असे केलेले नसते त्या दुकानातील नारळांना ही भरपूर तडे जातात. त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली, आता काहीतरी अघटीत घडणार, पूजा बरोबर झाली नाही, देव कोपला यासारखे विचार मनात अजिबात आणू नका बिंधास रहा. पूजेच्या वेळी नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)