Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vrishchik Sankranti: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे करा दान, सूर्य देवाचा राहील आशीर्वाद

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विधिपूर्वक पूजा केली जाते. त्याचप्रमाणे त्याची प्रार्थना देखील केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला देखील महत्त्व आहे. कोणत्या वस्तू दान कराव्यात जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 13, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वृश्चिक संक्रांती कधी आहे
  • सूर्य देव कधी संक्रमण करणार आहे
  • वृश्चिक संक्रांतीला कोणत्या गोष्टींचे दान करावे
 

ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. तो प्रत्येक राशीतून एक महिना संक्रमण करतो. अशा वेळी सूर्याला सर्व राशीमधून संक्रमण करण्यासाठी एक वर्ष लागते. ज्यावेळी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस संक्रांत म्हणून साजरा केला जातो. वृश्चिक राशीची संक्रांत रविवार, 16 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

कारण या दिवशी सूर्य तूळ राशी सोडून मंगळ राशीत प्रवेश करेल. या दिवशी सूर्याची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि परमेश्वराला पाणी अर्पण केले जाते. यामुळे सुख समृद्धी लाभते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने सूर्य देवाचा भक्तांवर आशीर्वाद राहतो असे देखील मानले जाते. वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे, जाणून घ्या

वृश्चिक संक्रांती कधी आहे

पंचांगानुसार, 16 नोव्हेंबर रोजी सूर्य तूळ राशी सोडून मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या या क्षणाला वृश्चिक संक्रांती म्हणतात. यामुळे यावेळी वृश्चिक संक्रांती रविवार, 16 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

Dream Science: स्वप्नात पूर्वजांना पाहणे शुभ आणि अशुभ, काय आहेत यामागील संकेत

वृश्चिक संक्रांती शुभ मुहूर्त

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाल आणि महापुण्यकालचा काळ स्नान, दान आणि पूजेसाठी सर्वोत्तम आणि पुण्यपूर्ण असतो. वृश्चिक संक्रांती रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.20 ते दुपारी 1.45 पर्यंत असणार आहे. त्याचा एकूण कालावधी 5 तास 43 मिनिटे असणार आहे. या दिवशी वृश्चिक संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी 11.58 ते दुपारी 1.45 पर्यंत असेल. त्याचा कालावधी 1 तास 47 मिनिटे असेल. वृश्चिक संक्रांतीचा मुहूर्त दुपारी 1.45 वाजता असेल.

याप्रकारे करा दान

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सूर्याशी संबंधित वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्याची प्रार्थना केल्यानंतरच दान करावे. सकाळी लवकर पवित्र नदीत स्नान करावे. पर्यायी, गंगाजल पाण्यात मिसळून देखील स्नान करता येते.

Trigrahi Yog: सूर्य, बुध आणि मंगळ तयार करणार त्रिग्रही योग, या राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

कोणत्या गोष्टींचे दान करावे

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लाल चंदन, फळे, कपडे आणि फुले इत्यादींचे दान करावे. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गरीब आणि गरजूंना गहू, केशर आणि गूळ देखील दान करू शकता. असे केल्याने साधकाला पुण्यफळ मिळते. कुंडलीतील सूर्याची स्थिती देखील बळकट होते. शिवाय, वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे साधकाच्या जीवनात सकारात्मक परिणाम मिळतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वृश्चिक संक्रांती कधी आहे

    Ans: वृश्चिक संक्रांती रविवार 16 नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: वृश्चिक संक्रांतीला कशाचे दान करावे

    Ans: वृश्चिक संक्रांतीला लाल चंदन, फळे, कपडे आणि फुले इत्यादींचे दान करावे.

  • Que: वृश्चिक संक्रांतीला दान करणे शुभ मानले जाते का

    Ans: होय, वृश्चिक संक्रांंतीला दान करणे शुभ आहे आणि ज्योतिषशास्त्रात दानाला महत्त्व आहे

Web Title: Vrishchik sankranti 2025 donate these items may the blessings of the sun god remain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
1

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची
2

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण
3

Bangle Buying Tradition: बांगड्या खरेदीची घाई नको! ‘या’ दिवशी चुकूनही घेऊ नका, जाणून घ्या कारण

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या
4

September Festival List : सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी ते पितृपक्षापर्यंत कोणते सण उत्सव येत आहेत ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.