
पत्रिकेतील ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यावर चांगला वाईट परिणाम घडवून आणते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.वेगवेगळ्या ग्रहांचं आपल्य़ा आयुष्यात विशेष असं महत्व आहे. त्यानुसार सांगायचं झालं तर, शुक्र हा प्रेम, सौंदर्य, कला आणि प्रेमाचा कारक आहे. मात्र याचे चांगले वाईट परिणाम हे पत्रिकेतीसल स्थानावर अवलंबून आहे. जन्मकुंडलीत शुक्राचे स्थान व्यक्तीच्या जीवनात प्रेम, सौंदर्य, कला, भोग, वैवाहिक सुख, आर्थिक ऐशआराम, आणि आकर्षण यावर मोठा परिणाम घडवते.
शुक्र हा सुख, सौंदर्य, कला, स्त्रीसौंदर्य, प्रेम, वैवाहिक जीवन, आणि ऐश्वर्य यांचा कारक ग्रह मानला जातो. तो जीवनात आनंद आणि भोगदायक सुख आणतो. ज्यांच्या कुंडलीत शुक्र बळकट असतो, त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक, कलात्मक आणि मोहक असतं.
शुक्राचे विविध भावांतील परिणाम आपण जाणून घेऊयात.
1लं स्थान (लग्न)
ज्यांच्य़ा पत्रिकेत शुक्र पहिल्या स्थानात असतो अशी मंडळी दिसायला आकर्षक, सुंदर आणि प्रसन्न चेहऱ्याची असतात. यांना कला, फॅशन, सौंदर्य क्षेत्रात यश मिळतं.ही सर्वांशी प्रेमाने वागतात.
2 रा भाव
दुसऱ्या भावात शुक्र असणाऱ्या व्यक्तींना पैशाची चणचण सहसा भासत नाही. ही माणसं समाजात मान प्रतिष्ठा मिळवतात. ही मंडळींना भौतिक सुखाची कमी नसते. ऐश्वर्यसंपन्न जीवन जगतात.
3रा भाव
कुंडलितल्या तिसऱ्या भावात शुक्र असणाऱ्यांना फिरण्याची आवड असते, लेखन, चित्रकला किंवा संगीत यामध्ये त्यांना रस असतो. ही मंडळी कलाकार असतात. कधी कधी अतिभावनिक होऊन नातेसंबंधात तणाव निर्माण होतो.
4था भाव
चौथ्या भावातील शुक्र सुखी घर, सुंदर वास्तू, वाहन-संपत्ती.मातेसंबंधित आनंद आणि घरगुती सौख्य वाढतं.परंतु इथे शुक्र कमजोर असेल तर घरातील कलह संभवतो.
5वा भाव
प्रेमसंबंध प्रबळ होतात.रोमँटिक प्रवृत्ती, सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता वाढते. या माणसांना पैशांची हाव नसते. आहे त्यात समाधानी राहतात. अपत्यसुख यांना चांगलं मिळतं.
6वा भाव
6व्या स्थानातील शुक्र काहीसा त्रासदायक ठरतो. वैवाहिक ताण, आरोग्याच्या समस्या किंवा विरोधक वाढतात.तसंच प्रेमात गैरसमज, अस्थिरता.
आर्थिक नुकसान अशा समस्यांना सामोरं जावं लागतं.
7वा भाव
उत्तम विवाह, सुंदर जीवनसाथी, आणि वैवाहिक सुख देखील मिळतं परंतु जर शुक्र अशुभ ग्रहांनी ग्रस्त असेल तर नात्यात फसवणूक किंवा अविश्वासाला सामोरं जावं लागतं.
8वा भाव
गुप्त प्रेमसंबंध, आकर्षण किंवा शारीरिक जवळीक यांना पाहिजे असते. अशांनीआरोग्याबाबत काळजी आवश्यक आहे, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
9वा भाव
ज्योतिष शास्त्रानुसार,9 व्या भावातील शुक्र भाग्यशाली जीवन, परदेशी प्रवास, उच्च शिक्षणात यश.धर्म, अध्यात्मातही रस निर्माण होतो.
10वा भाव
10 व्या भावातील शुक्र कला, सौंदर्य, चित्रपट, डिझाइन, फॅशन, मिडिया, पर्यटन अशा क्षेत्रात प्रचंड यश.करिअरमध्ये ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळते.
11 वा भाव
ज्योतिष शास्त्रानुसार, 11 व्या भावातील शुक्र आर्थिक लाभ आणि मित्रमंडळात आदर मिळवून देतो. 11 व्या स्थानातील शुक्रामुळे प्रेमसंबंध देखील चांगले प्रस्थापित होतात.
12 वा भाव
या मंडळींचं विलासी जीवनशैली, परदेशी वास्तव्य असतं. विचारांनी उत्तम व्यक्तिमत्त्व असल्याने अनेकांना यांच्या बद्दल आकर्षण वाटतं. शुक्र मजबूत असेल तर, सुंदर रूप, उत्तम व्यक्तिमत्त्व प्रेम, विवाह आणि ऐशआरामात यश मिळतं. ही मंडळी कला, फॅशन, चित्रपट, संगीत क्षेत्रात यश आर्थिक स्थैर्य यांचा चांगलं मिळतं. मात्र शुक्र अशुभ किंवा दुर्बल असेल तरप्रेमात फसवणूक किंवा निराशा येते. वैवाहिक कलह त्वचा, डोळ्यांचे आजार, मूत्रविकार असा त्रास यांना मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)