Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wedding Card Tips : लग्नाच्या पत्रिकेत ‘या’ गोष्टी नसाव्यात! असल्या तर समजून जा ‘कुछ तो अनहोनी जरूर होगी!’

लग्नाची पत्रिका ही केवळ आमंत्रण नसून नव्या आयुष्याची शुभ सुरुवात मानली जाते. त्यामुळे तिचा रंग, आकार आणि डिझाइन निवडताना वास्तुशास्त्रातील काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 11, 2026 | 09:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मंगल प्रसंग मानला जातो. त्यामुळे लग्नाच्या तयारीत पत्रिकेलाही विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार लग्नाची पत्रिका ही केवळ पाहुण्यांना आमंत्रण देण्याचे साधन नसून नव्या आयुष्याची शुभ सुरुवात मानली जाते. त्यामुळे पत्रिकेचा रंग, आकार, डिझाइन आणि त्यावरील मजकूर यांची निवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं

वास्तुनुसार लग्नाच्या पत्रिकेसाठी लाल, पिवळा, केशरी, मॅरून किंवा सोनेरी रंग शुभ मानले जातात. लाल रंग प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो, तर पिवळा आणि केशरी रंग सकारात्मक ऊर्जा व मंगलकार्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. याउलट काळा, गडद राखाडी किंवा अतिशय नकारात्मक छटा असलेले रंग टाळावेत, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.

पत्रिकेवर भगवान गणेश, स्वस्तिक, ॐ किंवा कलश यांसारखी शुभ चिन्हे असणेही महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः श्रीगणेशाचे चित्र किंवा चिन्ह असल्यास विवाहातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. मात्र देवतांची चित्रे अतिशय आधुनिक किंवा अस्पष्ट स्वरूपात छापणे टाळावे. पत्रिकेचा आकारही वास्तुनुसार महत्त्वाचा मानला जातो. आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या पत्रिका शुभ मानल्या जातात. अंडाकृती, गोल किंवा त्रिकोणी तसेच टोकदार कोपऱ्यांच्या डिझाइनला नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जाते. त्यामुळे अशा डिझाइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या

पत्रिकेतील मजकूर आदरयुक्त, स्पष्ट आणि वाचण्यास सोपा असावा. “ॐ श्री गणेशाय नमः” किंवा एखाद्या मंगल श्लोकाने सुरुवात करणे शुभ मानले जाते. अतिशय गुंतागुंतीचे किंवा वाचण्यास अवघड फॉन्ट वापरणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार लग्नाच्या पत्रिकेसाठी लेदर फिनिश किंवा रासायनिक चमक असलेला कागद वापरणे योग्य मानले जात नाही. त्याऐवजी पर्यावरणपूरक किंवा हँडमेड पेपर अधिक शुभ मानला जातो. पत्रिका छापल्यानंतर पहिली पत्रिका देवघरात गणपतीसमोर अर्पण करावी आणि त्यानंतर कुलदैवताच्या नावाने पत्रिका काढून मगच नातेवाईकांना वाटप सुरू करावे, अशी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते.

Web Title: Wedding card tips dont add these things in card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • daily vastu tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
1

Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.