फोटो सौजन्य- pinterest
जून महिन्याचा शेवटचा आठवडा आहे. यावेळी ग्रहांच्या हालचालीनुसार हा आठवडा ठरवला जाईल. या आठवड्यामध्ये जुने प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील तसेच ग्रहांच्या संक्रमणाचा सुद्धा या राशींच्या लोकांना परिणाम होऊ शकतो. मेष ते मीन राशि पर्यंतच्या लोकांचा जून महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असेल जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची साथ लाभेल. या लोकांना सुरुवातीचे काही दिवस धावपळ करावी लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ती लवकरच मिळेल. या आठवड्यात आळस करणे टाळावे. करिअरमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला एखादा मित्र भेटू शकतो. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट होऊ शकते. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो.
वृषभ राशीच्या लोकांसाठी शेवटचा आठवडा अनुकूल राहील. या लोकांना आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक फायदे होतील. या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
मिथुन राशीच्या लोकांना गेल्या आठवड्यापेक्षा हा आठवडा चांगला राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. व्यसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आठवडा चांगला राहील. सरकारी कामं पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात नुकसान होऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. तुम्ही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करु शकता त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा असेल. या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद तुम्हाला चिंताग्रस्त करू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आटवडा समृद्धीने भरलेला असेल. नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असाल तर त्याचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. न्यायालयीन प्रकरणांमधील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. विरोधकांचा पराभव होईल. जमीन, इमारत किंवा वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे दीर्घकाळ चाललेले वाद संपल्यामुळे तुमचा उत्साह उंचावलेला राहील. परिवाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा राहील. तुमच्यावर एखाद्या कामाची जबाबदारी सोपवली जाईल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नातेसंबंधामध्ये चढ उतार राहू शकतो.
धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला अचानक कुठूनतरी खूप पैसे मिळू शकतात. नोकरीच्या शोधात भटकत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करु शकता.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल राहणार आहे. उच्च शिक्षणाच्या मार्गात काही अडचणी येऊ शकतात. तुमचे खर्च नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तीशी तुमचा सकारात्मक संपर्क होऊ शकतो, जो तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. व्यवसायात वाढ होईल.
मीन राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य राहील. आर्थिक बाबतीत थोडे सावधगिरी बाळगा, अनावश्यक खर्च करू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची आवश्यकता आहे. कुटुंबात किरकोळ वाद होऊ शकतात
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)