Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghrishneshwar Jyotirlinga: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची काय आहे पौराणिक कथा, जाणून घ्या

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महत्त्वाचे मानले जाते. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास मनःशांती मिळते असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 27, 2026 | 11:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग
  • घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा
  • घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व
 

 

 

 

भारताच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील वेरूळ येथे स्थित आहे. भगवान शिव यांना समर्पित असलेले हे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घ्या

१२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं आणि भगवान शिवाच अत्यंत असे पवित्र मंदिर म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. प्रसिद्ध असा वेरूळ लेण्यामध्ये हे मंदिर आहे. वर्षभर येथे भाविकांची प्रचंड गदी असते. घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास हा प्राचीन काळाशी संबंधित आहे. अनेक आक्रमणामुळे हे मंदिर नष्ट देखील झाले आहे. नंतर मराठा साम्राजाच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यामुळे आज दिसणार हे मंदिर त्यांच्या काळातील बांधकाम शैलीचं उत्तम उदाहरण आहे. घृष्णेश्वर मंदिर लहान लहान दगडांनी बांधलेलं असून त्याची वास्तूकला अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या भीतीवरती आणि खांबावरती विविध देवदेवतांची आणि पौराणिक कथा दर्शवणारी शिल्प कोरलेली आहे. मंदिराचा सभागृह आणि गर्भागृह अत्यंत आकर्षण आहे. येथे भक्ताला शिवलिंगाला स्पर्श करून अभिषेक करण्याची परवानगी आहे. जे इतर अनेक ज्योतिर्लिंगामध्ये आढळत नाही. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घ्या

घृष्णेश्वर नावाचा अर्थ

“घृष्णेश्वर” या नावाचा अर्थ “करुणा आणि प्रेमाने भक्तांचे रक्षण करणारा भगवान शिव” असा होतो. काही ठिकाणी याला “घुश्मेश्वर” असेही म्हटले जाते.

Mohini Ekadshi: एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे मानले जाते अत्यंत शुभ आणि फलदायी

घृष्णेश्वर मंदिराची पौराणिक कथा

प्राचीन काळी देवगिरी परिसरात सुधर्मा नावाचा ब्राम्हण आणि त्याची पत्नी सुदेहा राहत होती त्यांना मुलं नव्हतं म्हणून सुदेहाने आपली बहीण कृष्णाशी आपल्या पतीचा विवाह लावून दिला. कृष्णा अत्यंत शिवभक्त होती ती रोज 101 शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असे आणि नदीत विसर्जन देखील करत असे. काही काळानंतर कृष्णाला पुत्र रत्न प्राप्त झाला. हे पाहून सुदेहाच्या मनात मत्सर निर्माण झाला एका रात्रीत तिने त्या मुलाला ठार मारून त्या नदीत टाकलं. दुसऱ्या दिवशी कृष्णाने शिवपूजा केली आणि देवावरती पूर्ण विश्वास ठेवला. तिच्या अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि तिचा पुत्र जिवंत केला. त्या ठिकाणी शिवाने ज्योतिर्लिंग रूप धारण केलं आणि भक्त कृष्णांच्या नावावरूनच त्या ज्योतिर्लिंगाला घृष्णेश्वर असे नाव पडले.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. म्हणूनच दरवर्षी येथे भाविकांची खूप गर्दी असते. याशिवाय महाशिवरात्रीला येते खूप मोठा उत्सव देखील पाहायला मिळतो. अनेक भक्त अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजा देखील करून घेतात.

Astro Tips: पूजेत अक्षता का वापरतात? जाणून घ्या यामागील धार्मिक महत्त्व

घृष्णेश्वर मंदिराचे धार्मिक महत्त्व

१२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग

दर्शनाने पापक्षालन आणि मनःशांती मिळते असे मानले जाते

श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला विशेष महत्त्व

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर कुठे आहे

    Ans: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद (छ. संभाजीनगर) जिल्ह्यातील वेरूळ येथे, एलोरा लेण्यांच्या जवळ स्थित आहे.

  • Que: शिवचे हे ज्योतिर्लिंग का महत्त्वाचे आहे?

    Ans: हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे (१२वे) ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे दर्शन घेतल्याने पापक्षालन होते आणि मनःशांती मिळते, असे मानले जाते.

  • Que: दर्शनासाठी कोणता वेळ योग्य आहे?

    Ans: सकाळी लवकर किंवा संध्याकाळी दर्शनासाठी शांत वातावरण मिळते. सणांच्या दिवशी मोठी गर्दी असते.

Web Title: What is the mythology of ghrishneshwar jyotirlinga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • hindu religion
  • Jyotirlinga
  • religions

संबंधित बातम्या

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
3

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.