Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या

खंडोबा हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय लोकदैवत मानले जाते. त्यांच्या मंदिरात विशेषतः जेजुरी येथे लंगर मोडणे ही एक महत्त्वाची परंपरा आहे. खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते, काय आहे यामागील कारण जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 22, 2026 | 10:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते
  • लंगर मोडण्याची काय आहे परंपरा
  • लंगर मोडण्यामागे काय आहे कारण
 

 

महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असलेले खंडोबा मंदिर म्हणजे जेजुरी. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं. रविवारी खंडोबाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. कारण रविवार हा खंडोबाचा मुख्य वार आहे. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’असा जयघोष करून पूजा केली जाते. अनेक जण खंडोबाला नवस देखील करतात आणि तो पूर्ण झाल्यावर फेडण्यासाठी लंगर मोडण्याची परंपरा प्रचलित आहे. खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते, यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया

लंगर मोडणे पारंपरिक पद्धत

जेजुरीमध्ये खंडोबाचा गोंधळ जर तुम्ही घातला असेल तर तेथे लंगर मोडणे हा पारंपरिक आणि श्रद्धेचा प्रकारही नक्कीच केला असेल. हा लंगर म्हणजे धातूंनी बनवलेला साखळेचा एक भाग. जो नवस पूर्ण केल्यानंतर अनेक जण मोडतात हा लंगर साखळीला लावून ही साखळी खिळ्याला लावली जाते आणि मग ती साखळी जोरात ओडून आपण आणलेला लंगर सदानंदाचा येळकोट म्हणत मोडला जातो. हा लंगर एका झटक्यात मोडला जातो. अर्धवट राहिलेला भाग घरी देवघरात ठेवून पूजला जातो.

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्णामांडाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य

लगंर मोडण्यामागे कारण

प्रत्येक पद्धतीमागे काहीतरी कारण असतं. असं म्हणतात, जीवनातील अडचणी, संकट आणि बंधन दूर व्हावी म्हणून खंडोबाला नवस केला जातो. नवस पूर्ण झाल्यानंतर लंगर मोडून देवाचे आभार मानले जातात. साखळी मोडणे म्हणजेच बंधनातून मुक्त होणे, हे याचेच प्रतीक आहे. असेही म्हणतात लंगर मोडणे म्हणजे मनातील भीती, अडथळे आणि नकारात्मकता तोडणे आणि संकटातून बाहेर पडण्याचा आनंद व्यक्त करणे आहे. जेजुरीत गेल्यानंतर तळी भंडारा भरून अनेक जण गोंधळ देखील घालून घेतात तेव्हा हा विधी करून घेतला जातो.

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

लग्नानंतर अनेक जोडपी गोंधळ घालून घेतात तेव्हा नवरदेवाकडून लंगर मोडून घेतले जाते. हे मोडलेले लंगर किंवा कडी हा देवाचाच प्रसाद असून त्याची पूजा केली जाते. हा विधी करण्यासाठी खास असा दिवस नाही. तुम्ही जेव्हा जेजुरीत जाता तेव्हा लंगर मोडू शकता. जर तुम्हाला लंगरचा तुकडा अचानक मिळाला तरी तुम्ही तो घरात ठेवू शकता. लंगरचा हा तुकडा शांतता, भरभराट आणि समृद्धी आणतो, असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: खंडोबाच्या दारी लंगर का मोडला जातो?

    Ans: नवस पूर्ण झाल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी आणि जीवनातील अडचणी व बंधन दूर झाल्याचे प्रतीक म्हणून लंगर मोडला जातो.

  • Que: लंगर म्हणजे काय?

    Ans: लंगर हा धातूपासून बनवलेला साखळीचा एक भाग असतो, जो नवस पूर्ण झाल्यावर मोडला जातो.

  • Que: लंगर मोडण्यामागील धार्मिक अर्थ काय आहे?

    Ans: साखळी मोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे, तसेच भीती, अडथळे आणि नकारात्मकता दूर करणे असे मानले जाते.

Web Title: What is the reason behind breaking the anchor of khandoba door

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
1

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
3

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.