
फोटो सौजन्य - Social Media
वनवासानंतर पांडवांना अज्ञातवास भोगायचा होता. त्यांना एकावर्षासाठी अज्ञात व्हायचे होते. त्यांची ओळख कुणालाही कळून द्यायची नव्हती. जेणेकरून त्यांना त्यांच्या हक्काचे इंद्रप्रस्थाचे राज्य मिळून जाईल. या अज्ञातवसेमध्ये पांडवांनी विराट राजाचे राज्य निवडले. तेथे पाचही भाऊ आणि त्यांची अर्धांगिनी दौप्रदी एका वर्षाच्या अज्ञातवासेसाठी होते. याची माहिती स्वतः विराट राजालाही नव्हती. पण ते सहा जण तेथेच विराटाच्या दरबारी ओळख लपवून राहत होते.
या दरम्यान धर्मराज युद्धिष्ठिर फासे खेळण्याचे काम करून दरबारातील मंत्र्यांचे मनोरंजन करत असे. तर वायुपुत्र भीम आचारी म्हणून काम पाहू लागला. इंद्रपुत्र अर्जुन नर्तक म्हणून दरबारात मनोरंजन करत होता तर नकुल अश्वबन्ध होऊन तबल्याचे काम पाहत होता. सहदेव गोठ्याचे सर्व व्यवस्थापन पाहत होता. अशात दौप्रदी मत्स्य राज्यच्या राणीची दासी म्हणून काम पाहत होती. तशी ती सुंदर आणि आकर्षक होती. तिला पाहून राज्याचा सेनापती किचक भाळून गेला. त्याने याबद्दल राणीलाही सांगितले. कीचकाचा मनात फुटणाऱ्या चांदण्याला दौप्रदी ओळखून बसली होती. तिने राणीला सांगूनच ठेवले होते की तिचे रक्षण स्वर्गातील पाच गंधर्व करतात.
किचक तसा राणीचा भाऊ! कीचकाचा ही विनवणी ऐकून राणीने त्याला त्या गंधर्वांबद्दल सांगितले पण किचकाला त्याच्या सामर्थ्याचा अहंकार होता. तो म्हणाला मी नाही घाबरत गंधर्वांना! त्याच्या हट्टीपणामुळे राणीने दौप्रदीला एकट्यात कीचकाचा घरी पाठवले. पण त्याआधी दौप्रदीने २ प्रहार सूर्याची उपासना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि तिच्या रक्षणाकरिता एका राक्षसाची नियुक्ती केली पण कीचकाचा सामर्थ्यापुढे त्या राक्षसाचा काहीच टिकाव लागला नाही. त्याने त्या राक्षसाला दूर फेकून दिले. द्रौपदी धावत धावत विराटाच्या महालात आली. तेथे किचक तिच्या मागे धावत आला आणि तिच्या चेहऱ्यावर जोरात लात मारली. तिच्या चेहऱ्यातून रक्ताची धार लागली. तिथे उभा असणाऱ्या युद्धिष्ठिरानेदेखील या विरोधात काहीच भूमिका घेतली नाही. राजा आणि राणीने ही या विरोधात काही केले नाही. पण तिथे उभा असणाऱ्या भीमाने द्रौपदीला सांगितले की त्याला रात्री नर्तकगृहात बोलावं एकट्यात! त्या नर्तकगृहात भीमाने कीचकाचा वध केला.