फोटो सौजन्य- pinterest
प्रदोष व्रत हे खूप खास असते. हे व्रत महादेवांना समर्पित आहे. प्रदोष व्रत दर महिन्याला दोनदा कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी आणि शुक्ल पक्षाच्या तेराव्या दिवशी येते. हे व्रत ज्या दिवशी येते त्या दिवसाचे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच सोमवारी येणाऱ्या व्रताला सोम प्रदोष व्रत. ज्योतिषशास्त्रानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात आनंद आणि शांती येते आणि सर्व संकटे दूर होतात.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केला जातो. हिंदू मान्यतेनुसार, प्रदोष व्रताला शिवलिंगावर अभिषेक केल्याने महादेवांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो. म्हणून या दिवशी महादेवांचा अभिषेक करावा. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येते. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात, जाणून घ्या
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.7 वाजता होणार आहे. या तिथीची समाप्ती मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.5 वाजता होईल. अशा वेळी 3 नोव्हेंबर रोजी हे व्रत पाळले जाणार आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते.
प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी आवरुन झाल्यानंतर महादेवाची पूजा करावी त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. असे मानले जाते की, या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने सर्व आजार दूर होतात आणि भगवान शिवाची कृपा आणि आशीर्वाद भक्तांवर राहतात, असे म्हटले जाते.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल, तांदूळ आणि दूध अर्पण करावे. असे केल्याने महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे भक्तांची कर्जातून सुटका होते. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने मानसिक ताण देखील कमी होतो.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा. असे केल्याने शुभ फळ मिळतात. तसेच घरामध्ये धन आणि समृद्धी वाढते.
प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर शमीची फूले अर्पण करावीत. असे केल्याने महादेवांचा आशीर्वाद मिळतात. तसेच भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते. इच्छित वरदान देखील मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






