फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 2 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे. या संक्रमणामुळे मालव्य राजयोग तयार होईल. शुक्र हा धन, कीर्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र राशीतील बदल आणि मालव्य राजयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनावर होणारे परिणाम फायदेशीर असेल. व्यवसाय आणि व्यापारात आर्थिक लाभ होऊ शकतो. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मालव्य राजयोग हा खूप शुभ आहे. हा पाच महापुरुष योगांपैकी एक योग आहे. पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात शुक्र स्थित असताना हा योग तयार होतो. ज्यावेळी शुक्र स्वतःच्या राशी वृषभ, तूळ आणि मीन राशीत असेल त्यावेळी हा योग तयार होतो.
मालव्य राजयोगाचा वृषभ राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये तु्म्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील संबंध चांगले राहतील.
मालव्य राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. तसेच तुम्हाला नवीन संधी मिळू शकतील. तुमचे प्रलंबित काम वेळेवर पूर्ण होतील. त्यासोबत तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळेल. या काळात घरामध्ये शुभ कार्य होऊ शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो.
मालव्य राजयोगाचा धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या काळात तुम्ही खूप प्रसिद्ध होऊ शकता. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. परदेश प्रवास करण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला असेल. व्यवसायात गुंतवणूक केल्याने भरीव फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप शुभ असणार आहे. मकर राशीच्या लोकांचा व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो. तसेच तुमची नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते. त्यासोबतच व्यावसायिकांना आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






