Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradosh Vrat 2026: श्रावण महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

श्रावण महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत शुक्ल त्रयोदशीला पाळले जाणार आहे. या दिवशी मंगळवार असल्याने त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हटले जाते. त्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे. पूजेसाठी २ तास १३ मिनिटे इतका कालावधी असेल. हे व्रत पाळल्याने आरोग्य, सुख, धन आणि संतती प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 20, 2026 | 12:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे
  • प्रदोष व्रत मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
  • प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत का म्हटले जाते
 

श्रावण महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत मंगळवारी, म्हणजेच श्रावण शुक्ल त्रयोदशी तिथीला येत आहे. या दिवशी मंगळवार असल्यामुळे हा भौम प्रदोष व्रत असेल. याच दिवशी मंगळागौरीचे व्रत देखील पाळले जाणार आहे. या उपवासात शिव पूजेसाठी सुमारे सव्वादोन तासांची शुभ वेळ असते. ही शुभ वेळ सायंकाळची असते, कारण प्रदोष उपवासाची पूजा सायंकाळी केली जाते. उपवासाच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होतो, ज्यामुळे तिहेरी लाभ मिळतो.

कधी आहे प्रदोष व्रत

पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथीची सुरुवात मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६:२० वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. उदयतिथीनुसार त्रयोदशी तिथी २६ ऑगस्ट रोजी येते, परंतु श्रावण महिन्याचा शेवटचे प्रदोष व्रत मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या

प्रदोष व्रत मुहूर्त

यावर्षी भौम प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सायंकाळी ६:५१ ते रात्री ९:०४ पर्यंत आहे. भक्तांना शिव पूजेसाठी २ तास १३ मिनिटांचा शुभ वेळ मिळेल. प्रदोष दिवशी, ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:२७ ते पहाटे ५:११ पर्यंत, तर अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५७ ते दुपारी १२:४९ पर्यंत आहे. २६ ऑगस्ट रोजी निशिता मुहूर्त मध्यरात्री १२:०१ ते मध्यरात्री १२:४५ पर्यंत आहे.

प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ योग

श्रावण महिन्यातील भौम प्रदोष व्रत त्रिपुष्कर योगामध्ये येत आहे. यावेळी त्रिपुष्कर योग सकाळी ५:५५ ते ६:२० पर्यंत असेल. या योगादरम्यान केलेल्या शुभ कर्मांचे तिप्पट फळ मिळते. प्रदोष दिवशी रवी योग देखील तयार होत असून, तो २६ ऑगस्ट रोजी रात्री १०:५१ ते पहाटे ५:५६ पर्यंत चालेल. रवी योग हा देखील एक शुभ योग आहे. या दिवशी त्रिपुष्कर योग, रवी योगासोबत आयुष्मान योग सकाळी ७:४१ वाजेपर्यंत असणार आहे. हा योग दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतो. सौभाग्य योग सकाळी ७:४१ वाजल्यापासून तयार होईल आणि सूर्यास्तापर्यंत राहील. त्रयोदशीच्या उपवासाच्या दिवशी, उत्तराषाढा नक्षत्र सकाळपासून रात्री १०:५१ वाजेपर्यंत टिकेल, त्यानंतर श्रावण नक्षत्र सुरू होईल.

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

भौम प्रदोष व्रताचे काय आहे महत्त्व

भौम प्रदोष व्रत करणाऱ्यांना भगवान शिवाच्या कृपेने सुख, शांती, आरोग्य, शक्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे, त्यांना शिवाच्या कृपेने दिलासा मिळतो. संततीसाठी देखील प्रदोष व्रत पाळले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे

    Ans: श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत मंगळवार, 25 ऑगस्ट रोजी आहे

  • Que: श्रावणातील प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे?

    Ans: प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित मानले जाते. श्रावण महिना शिवभक्तीसाठी विशेष असल्याने या काळातील प्रदोष व्रताला विशेष धार्मिक महत्त्व असल्याची श्रद्धा आहे.

  • Que: प्रदोष व्रत केल्याने काय लाभ होतात?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रतामुळे भगवान शिवाची कृपा मिळते, मनःशांती लाभते आणि संकटांपासून मुक्ती मिळण्याची श्रद्धा आहे. हे धार्मिक विश्वास आहेत.

Web Title: When is bhauma pradosh vrat muhurt yoga and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न
1

Sarvapitri Amavasya: सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाशी संबंधित करा हे विशेष उपाय, पूर्वज आणि शनिदेव होतील प्रसन्न

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र
2

Sahasra Chandra Darshan: हजार पौर्णिमा झाल्यावरच सहस्रचंद्रदर्शन सोहळा करावा की आगोदर? काय सांगते धर्मशास्त्र

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
3

Lairai Devi Temple: गोव्यातील लइराई देवी कोण आहे? शिरगाव जत्रेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध
4

Shadashtak Yog: ९ ऑक्टोबरला तयार होणार षडाष्टक योग, ‘या’ ५ राशींनी राहावे सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.