Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वटपौर्णिमा 26 मे की 11 जून नेमकी कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व

हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा आणि वटसावित्री सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा वटसावित्रीचे व्रत उत्तर महाराष्ट्रात 26 मे रोजी तर वटपौर्णिमेचे व्रत महाराष्ट्रात 11 जून रोजी पाळले जाणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 05, 2025 | 04:57 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते. हे व्रत सर्वप्रथम सावित्रीने आपल्या पतीसाठी पाळले होते. सावित्रीने तिच्या भक्ती आणि हुशारीने यमराजापासून तिच्या पतीचे प्राण परत मिळवले होते. सर्व विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.

हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्तव असते. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी विवाहित महिला पौर्णिमेचे व्रत पाळतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. जाणून घ्या वटसावित्री आणि वटुपौर्णिमा नेमकी कधी आहे.

कधी आहे वटसावित्री

ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला वट सावित्री व्रत पाळले जाते. उत्तर महाराष्ट्रात वटसावित्रीचे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात. या व्रताच्या तिथीची सुरुवात सोमवार, 26 मे रोजी दुपारी 12.11 मिनिटांनी सुरु होईल आणि त्याची समाप्ती मंगळवार, 27 मे रोजी सकाळी 8.31 मिनिटांनी होईल. ज्येष्ठ अमावस्या तिथी दुपारी येते तेव्हा वट सावित्री व्रत दुपारी करणे योग्य आहे, असे म्हटले जाते.

Apara Ekadashi: अपरा एकादशीला करु नका या चुका, नाहीतर भगवान विष्णूंचा होईल कोप

तसेच महाराष्ट्रामध्ये मंगळवार 10 जून रोजी सकाळी 11.35 मिनिटांनी पूर्णिमा तिथीची सुरुवात होईल तर त्याची समाप्ती बुधवार, 11 जून रोजी दुपारी 1.13 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार वटपौर्णिमेचे व्रत बुधवार, 11 जून रोजी पाळले जाणार आहे.

वर्षातून दोनदा पाळले जाते हे व्रत

देशाच्या वेगवेगळ्या भागात वट सावित्री व्रत वेगवेगळ्या तारखांना पाळले जाते. उत्तर भारतात, वट सावित्री अमावस्या साजरी केली जाते, तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात, ज्येष्ठ पौर्णिमे म्हणजेच ‘वट पौर्णिमा’ म्हणून हे व्रत पाळले जाते जे यावेळी 11 जून रोजी आहे.

वटसावित्री आणि वट पौर्णिमा व्रताचे महत्त्व

वटसावित्री व्रत

वटसावित्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर उपवास करावा. महिलांनी या दिवशी प्रामुख्याने लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि श्रृंगार करावा. यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करुन हळद, कुंकू, संपूर्ण तांदूळ, सिंदूर, माऊली (कळवा), पाणी, फळे आणि इतर पूजा साहित्य सोबत ठेवा. वडाच्या झाडावर कच्चा धागा गुंडाळा आणि त्याला सात, २१ किंवा १०८ वेळा प्रदक्षिणा घाला. मग सावित्री-सत्यवानाची कथा वाचा आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी पाणी किंवा फळांनी उपवास सोडा.

Chanakya Niti: या लोकांना चुकूनही करु नये मदत, अन्यथा आयुष्यभर करावा लागू पश्चाताप

वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून वटसावित्री आणि वटपौर्णिमा व्रताची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, वट सावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद मिळतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: When is vat purnima 2025 may 26 or june 11 know the correct date shubh muhurat significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Gemology: मोतीसोबत ही रत्ने परिधान करणे टाळा, वाढू शकतो मानसिक तणाव आणि आर्थिक त्रास
1

Gemology: मोतीसोबत ही रत्ने परिधान करणे टाळा, वाढू शकतो मानसिक तणाव आणि आर्थिक त्रास

Chhath Puja 2026: छठपूजेसाठी उत्तर भारतीय आवर्जून गावी का परततात? जाणून घ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
2

Chhath Puja 2026: छठपूजेसाठी उत्तर भारतीय आवर्जून गावी का परततात? जाणून घ्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shukra Margi 2026: १४ नोव्हेंबरपासून या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश
4

Shukra Margi 2026: १४ नोव्हेंबरपासून या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.