Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinayak Chaturthi: वैशाख महिन्यातील कधी आहे विनायक चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि फायदे

आज सोमवार, 20 एप्रिल रोजी वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. जे भक्त विनायक चतुर्थीचे व्रत पाळतात त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. विनायक चतुर्थी कधी आहे, मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 20, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे
  • विनाायक चतुर्थी मुहूर्त
  • विनायक चतुर्थी महत्त्व आणि फायदे
 

 

गणपती बाप्पाच्या पूजेसाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. आज सोमवार, 20 एप्रिल रोजी विनायक चतुर्थी आहे.

विनायत चतुर्थी पूजेसाठी मुहूर्त

विनायक चतुर्थीची सुरुवात रविवार, 19 एप्रिल रोजी सायंकाळी ६:५७ वाजता झाली आणि या तिथीची समाप्ती सोमवार, 20 एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता होईल. यामुळे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सोमवार, 20 एप्रिल रोजी सकाळी ११:४८ ते दुपारी २:२८ पर्यंत (अंदाजे २ तास ३९ मिनिटे)

Monday Puja: शिवलिंगावर कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणती टाळावीत? जाणून घ्या नियम

विनायक चतुर्थी पूजा करण्याची पद्धत

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर
पूजा मांडणी घरातील देवाऱ्यात किवा चौरंगावर गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. चौरंगावर पिंजरीने आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. गणपतीच्या मूर्तीला जल अर्पण करून अभिषेक करावा, चंदन, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. त्यानंतर गणपतीला प्रिय असलेली जास्वंदाची फुले, दुर्वा आणि मोदक/लाडूचा नैवेद्य दाखवावा. नंतर मंत्र व स्तोत्र अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे वाचन करावे, गणपतीच्या मंत्रांचा जप करावा. आरती करावी. दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी फलाहार करावा.

विनायक चतुर्थीचे महत्त्व

प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. विनायक या शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित नायक असा होतो. असे मानले जाते की विनायक चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हकाळात गणेश पूजन केले जाते. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्हच्या वेळी म्हणजेच दुपारी सोडला जातो. गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाच्या जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते यामुळे विनायक चतुर्थीच देखील वेगळं महत्त्व आहे. विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारी आहे.

Chandra Gochar:  चंद्राने केला वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

विनायक चतुर्थीचे फायदे

जी व्यक्ती विनायक चतुर्थीचा उपवास करतो त्याला सर्व कामामध्ये यश आणि सिद्धी मिळते. कुंडलीतील राहू केतू दोष दूर होतात. नोकरी, परीक्षा, लग्न, मुले, न्यायालयीन प्रकरणे इत्यादी कामातील सर्व अडथळे दूर होतात. गणपती बाप्पाच्या कृपेने घरात सुख, शांती, समृद्धी आणि बालसुख प्राप्त होते

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी कधी येते?

    Ans: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते.

  • Que: विनायक चतुर्थीचे फायदे काय आहेत?

    Ans: जीवनातील अडथळे दूर होतात, बुद्धी आणि यश प्राप्त होते, आर्थिक स्थितीत सुधारणा होते

  • Que: या दिवशी कोणता मुहूर्त शुभ मानला जातो?

    Ans: सकाळचा शुभ मुहूर्त आणि विशेषतः मध्यान्ह काळ (मध्यान्ह काल) गणेश पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Web Title: When is vinayak chaturthi muhurta in the month of vaishakh puja method importance and benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Vinayaka Chaturthi

संबंधित बातम्या

Sant Girijabai Story: चोरांनाही प्रेमाने अन्न देणाऱ्या संत गिरिजाबाईंची प्रेरणादायी कथा
1

Sant Girijabai Story: चोरांनाही प्रेमाने अन्न देणाऱ्या संत गिरिजाबाईंची प्रेरणादायी कथा

Girnar Yatra: भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केलेला गिरनार पर्वत, जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Girnar Yatra: भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केलेला गिरनार पर्वत, जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Guru Purnima 2026: कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा उपाय
3

Guru Purnima 2026: कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा उपाय

Shani Vakri: शनिच्या वक्री चालीमुळे या राशींच्या लोकांना करावा लागू शकतो अडचणींचा सामना
4

Shani Vakri: शनिच्या वक्री चालीमुळे या राशींच्या लोकांना करावा लागू शकतो अडचणींचा सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.