Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वामींच्या हातून तलवार मिळावी ही वासुदेव बळवंत फडकेंची इच्छा, मात्र स्वामी समर्थ म्हणाले…

आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन. या दिवसाच्या निमित्ताने आज आपण स्वामी समर्थ आणि आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या भेटीविषयी जाणून घेणार आहोत .

  • By मयुर नवले
Updated On: Mar 31, 2025 | 12:27 PM
फोटो सौजन्य; Social Media

फोटो सौजन्य; Social Media

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात गुरु परंपरेचा इतिहास हा खूप मोठा आहे. आजही कित्येक जण गुरूंनी सांगितलेल्या अध्यात्माच्या मार्गाने चालत समृद्ध आयुष्याचा आनंद जगण्याचा प्रयत्न करत असतात. गुरु परंपरेत दत्त गुरू आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते. यात स्वामी समर्थांचा उल्लेख विशेष करावा लागेल.

आज श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. या निमित्ताने देशभरातील भाविक स्वामींच्या अक्कलकोट नगरीत दाखल होत असतात. तसेच अनेक ठिकाणी स्वामींच्या मठात विविध कार्यक्रम आयोजिले जातात. स्वामींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण क्वचित लोकांना स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यातील भेटीबद्दल ठाऊक असेल. चला याबद्दल जाणून घेऊया.

swami samarth prakat din: प्रकट दिनाच्या दिवशी अशी करा पूजा, स्वामी होतील प्रसन्न

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात न जाणो कित्येक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनक असे देखील म्हंटले जाते. पण खूप कमी जणांना माहित आहे की ते दत्त उपासक देखील होते. त्यांची दत्त गुरूंवर विशेष श्रद्धा होती. तसेच त्यांनी सात हजार ओव्यांचा दत्तमहात्म्य नावाचा ग्रंथ देखील लिहिला होता.

वासुदेव बळवंत फडकेंची स्वामी समर्थांवर सुद्धा श्रद्धा

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे स्वामी समर्थांचे मोठे भक्त होते. फडके स्वामींचे दर्शन घेण्यासाठी दोन ते तीन वेळा अक्कलकोटला गेले होते असे म्हंटले जाते. वासुदेव बळवंत फडके यांनी ठरवले होते की भिल्ल, रामोशी,आगरी आणि कोळी इत्यादी समाजातील लोकांना एकत्रित करून ब्रिटीश सरकारविरोधात बंड करण्याचे ठरवले. मात्र, हा बंड पुकारण्याअगोदर त्यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्याचे ठरवले.

स्वामी काय म्हणाले?

नेहमीप्रमाणे वासुदेव बळवंत फडके अक्कलकोट नगरीत स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पोहचले. यावेळी ते स्वामींना शरण गेले आणि आपल्या हातातील तलवार स्वामींसमोर ठेवली. खुद्द स्वामींच्या शुभ हाताने तलवार मिळावी आणि त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा ही त्यांची इच्छा होती.

dream science: नवरात्रीमध्ये स्वप्नात या गोष्टी दिसल्यास तुमच्यावर राहील देवीचा आशीर्वाद

वासुदेव बळवंत फडकेंची ही इच्छा स्वामींनी शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, “हम जानते हैं | यह नेक काम है |” त्यानंतर त्यांनी एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले.

स्वामी समर्थांनी फडके यांना सावध करत सांगितले, “अभी वक्त नहीं हैं |” म्हणजेच, जरी त्यांचे कार्य उचित असले तरी ही क्रांती यशस्वी होणार नाही. मात्र, फडके आपल्या संकल्पावर ठाम होते आणि मागे हटण्यास तयार नव्हते. शेवटी त्यांनी तलवार घेतली, स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि पुढील प्रवासाला निघून गेले.

नंतरच्या काळात त्यांची क्रांतीची लढाई अपयशी ठरली. वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली आणि अखेर शके १८०४, माघ शुद्ध एकादशी या दिवशी एडन येथील कारागृहात त्यांचे निधन झाले.

Web Title: When swami samarth met freedom fighter vasudev balwant phadke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • freedom fighters
  • religion news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?
1

Jai Jai Swami Samarth मध्ये भक्ती विरुद्ध स्वार्थाची लढाई, भक्ताला न्याय मिळवून देणार का स्वामी समर्थ?

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची
2

Shree Swami Samarth : जेव्हा स्वामी पहिल्यांदा रडले ; गोष्ट आहे दत्तसंप्रदायातील एका थोर भक्ताची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.