
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात शनिदेवांना कर्मफळांच न्यायाधीश मानलं जात असल्यामुळे कर्मफळाची भीती बाळगण्यापेक्षा कर्मफळाची जाणीव ठेवणं हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं. शनि शिक्षा देतात अशी समजूत असली तरी धर्मग्रंथांनुसार ते चांगल्या कर्माचे चांगले वाईट कर्माचे योग्य फळ देतात. आता खरंच कोणाला शनि देवांची भीती वाटू शकते? अशा व्यक्ती ज्या जाणूनबुजून चुकीची काम करतात. फसवणूक, भ्रष्टाचार, अन्याय, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणं, गरीब दुर्बळ किंवा गरजू व्यक्तींना त्रास देणं, अशा व्यक्तींनी शनि देवांपासून जरा जपूनच राहिला हवं.
अहंकारी आणि सत्येचा गैरवापर करणाऱ्यांचा हा शनि अहंकारतेचा नम्रतेचा धडा शिकवतात, अशी धार्मिक मान्यता आहे. खोट बोलणं, फसवणूक करणं किंवा विश्वासघात करणं ही कर्म शनिला अप्रिय मानली जातात. आई वडील, गुरू आणि ज्येष्ठांचा अपमान करणारेसुद्धा शनिला अजिबात आवडत नाही. धर्मग्रंथांमध्ये ज्येष्ठांचा अनादर हे नकारात्मक कर्म मानलं जातं. मग चांगल्या माणसाने शनि देवाला घाबरावं का नाही.
धार्मिक श्रद्धेनुसार, प्रामाणिकपणे कष्ट करणारा, सत्याचा मार्ग स्वीकारणारा, गरजूंना मदत करणारा, संयमी आणि शिस्तप्रिय व्यक्ती यांना शनिदेवांची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही उलट अशा व्यक्तींवरती शनि देवांची कायम कृपा राहते.
अनेकांना असं वाटतं की शनिची साडेसाती किंवा महादशा म्हणजे फक्त संकट. पण हे पूर्णपणे खरं नाही. या काळात अनेकांना करिअरमध्ये यश, आर्थिक प्रगती, जबाबदारीची जाणीव आणि आयुष्यात तेज सुद्धा मिळतं. हा काळ अनेकदा संयम, मेहनत आणि आत्मपरीक्षण शिकवणारा मानला जातो.
शनिदेवांच्या उपासनेतून कर्माला विशेष महत्त्व दिले जाते. सत्य, प्रामाणिकपणा, मेहनत, संयम, शिस्त आणि गरजूंची सेवा यांसारख्या चांगल्या गुणांचा स्वीकार करणे हा या श्रद्धेचा मुख्य संदेश आहे. त्यामुळे शनिदेवांना घाबरण्यापेक्षा आपल्या प्रत्येक कृतीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कर्म चांगले असेल तर शनिदेवांची भीती नव्हे, तर त्यांच्या कृपेची अपेक्षा ठेवावी, अशी धार्मिक मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांनुसार त्याला योग्य फळ देतात.
Ans: फसवणूक, भ्रष्टाचार, अन्याय, खोटेपणा, विश्वासघात आणि दुसऱ्यांचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींनी सावध राहावे, अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: गरीब व गरजूंचा छळ करणे, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे, अहंकार, फसवणूक आणि ज्येष्ठांचा अपमान करणे ही कर्मे शनिदेवांना अप्रिय मानली जातात.